‘कोरोना बाधित असलेल्या माझ्या ५ वर्षीय मुलाची मी हत्या केली’, या खेळाडूचा धक्कादायक खुलासा

लोकल ते ग्लोबल
Updated May 14, 2020 | 22:14 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Turkish footballer kills son: तुर्की इथल्या एका फुटबॉलपटूनं धक्कादायक खुलासा केलाय.त्यानं आपल्या कोरोनाग्रस्त ५ वर्षीय मुलाची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केलाय.नंतर मात्र मुलाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता

kasim toktas
‘या’ खेळाडूनं केली कोरोनाग्रस्त ५ वर्षीय मुलाची हत्या  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • तुर्कीच्या फुटबॉलपटूनं केली आपल्या ५ वर्षीय मुलाची हत्या
  • मुलगा पालथा झोपला असतांना तब्बल १५ मिनीटं उशीनं दाबून ठेवत केली हत्या
  • पोलिसांसमोर स्वत: येऊन दिला कबुलीजबाब, फुटबॉलपटूला अटक

अंकारा: कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. सध्या जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचं पालन केलं जातंय. यादरम्यान अनेक देशांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमतरता आलीय, पण तुर्कीमध्ये एक अशी भयंकर घटना उघडकीस आलीय ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. एका प्रसिद्ध फुटबॉलपटूनं आपल्या ५ वर्षाच्या मुलाची हत्या केलीय, ज्याच्यावर कोरोना संक्रमणावरील उपचार सुरू होते.

तुर्की इथल्या अधिकाऱ्यांनी माजी फुटबॉलपटू केवहेर टोकटासला अटक केली आहे, ज्यानं आपल्या पाच वर्षीय मुलाची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. टोकटासनं स्वत: पोलिसांसमोर आत्मसर्मपण केलं आणि आपल्या गुन्ह्याबाबत सांगितलं. त्यानं सांगितलं की, ४ मे रोजी त्यानं आपल्या मुलाची गळा दाबून हत्या केली होती.

त्यानंतर मात्र मुलाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. फुटबॉलरचं म्हणणं आहे की, त्यानं मुलाला यासाठी मारलं कारण त्याचं मुलावर प्रेम नव्हतं. मुलाला खोकला आणि ताप येत होता. ज्यामुळे त्याला २३ एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं. तो आपल्या वडिलांसोबत क्वारंटाईनमध्ये होता.

डॉक्टरांना खोलीत बोलावलं होतं

स्थानिक बातम्यांनुसार, केवहेरनं डॉक्टरांना आपल्या खोलीत बोलावलं आणि सांगितलं की, त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे. डॉक्टरांनी लगेच मुलाला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं जिथं त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी सांगितलं गेलं की, मुलाचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झाला. मात्र यानंतर मुलाच्या वडिलांनी स्वीकार केलं की, त्यानं आपल्या मुलाच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली होती.

हा आहे टोकटासचा कबुलनामा

माजी फुटबॉलपटू टोकटासनं इथल्या कार्सी पोलीस स्टेशनमध्ये जावून सरेंडर केल्यानंतर आपला कबुली जबाब लिहून दिला. यात लिहिलं होतं, ‘माझा मुलगा जेव्हा पालथा होऊन झोपला, तेव्हा मी उशीनं त्याला दाबलं. मी १५ मिनिटांपर्यंत त्याला उशीनं दाबून ठेवलं होतं. यादरम्यान तो तडफडत होता. जेव्हा त्याचं तडफडणं बंद झालं तेव्हा मी उशी काढली. नंतर मी ओरडून डॉक्टरांना बोलावलं जेणेकरून माझ्यावर कुणी संशय घेणार नाही. मी माझ्या लहान मुलावर त्याच्या जन्मापासूनच प्रेम करत नव्हतो. मला माहिती नाही पण माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं. मी त्याला मारलं कारण तो मला आवडत नव्हता. माझी मानसिक स्थिती खराब नाही आहे.’

फेसबुकवर मुलाच्या कब्रचा फोटो केला होता शेअर

आपला गुन्हा कबूल करण्याच्या काही दिवसांपूर्वी टोकटासनं आपल्या मुलाच्या कब्रचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. ज्यात लिहिलं होतं, ‘जगावर विश्वास ठेवू नको.’ टोकटास तुर्कीच्या रिजनल एमेचर फुटबॉल लीगमध्ये बुर्सा क्लबकडून सेंटर बॅकच्या रुपात खेळत होता. यापूर्वी पण तो तुर्कीच्या अनेक लहान-मोठ्या फुटबॉल क्लबकडून खेळला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी