Coronavirus in India Updates: देशात गेल्या 24 तासात आढळले कोरोनाचे हजारो रूग्ण, 45 जणांचा मृत्यू; जाणून घ्या अपडेट माहिती

Coronavirus in India: भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची एकूण 4,36,69,850 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सद्यस्थितीत देशात 1,32,457 सक्रिय प्रकरणे आहेत जी एकूण प्रकरणांच्या 0.30 टक्के आहेत.

Corona Virus In India
कोरोना व्हायरस अपडेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव अजूनही दिसून येत आहे.
  • आतापर्यंत देशात कोविडची लागण झाल्यानंतर एकूण 4,30,11,874 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातल्या कोविडची ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: Corona virus Update In India: देशात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव अजूनही दिसून येत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झालेले नवीन 16,906 रूग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाबाधित 45 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. यादरम्यान 15 हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात कोविडची लागण झाल्यानंतर एकूण 4,30,11,874 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Union Ministry of Health)  देशातल्या कोविडची ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची एकूण 4,36,69,850 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सद्यस्थितीत देशात  1,32,457 सक्रिय प्रकरणे आहेत जी एकूण प्रकरणांच्या 0.30 टक्के आहेत. देशातला रिकव्हरी रेट 98.49 टक्के आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 5,25,519 लोकांचा बळी गेला आहे. 

अधिक वाचा- महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, 'या' सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या राज्यातील पावसाची सद्यस्थिती 

कोरोना चाचणी 

देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत एकूण 199.12 कोटी लसीचे डोस लोकांना देण्यात आले आहेत. देशातील दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 3.68 टक्क्यांवर आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 4.26 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 4,59,302 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 86.77 कोटी चाचण्या झाल्या आहेत. 86,77, 69, 574 इतक्या चाचण्या देशात करण्यात आल्या आहेत. 

देशातील कोरोनाची पार्श्वभूमी 

7 ऑगस्ट 2020 रोजी देशात कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख होती. तर  23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी रूग्णांची एकूण संख्या 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर पोहोचली होती.

अधिक वाचा- मुंबईत पावसाचा जोर वाढला, लोकलही ट्रेन स्लो; जाणून घ्या शहरातील पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

19 डिसेंबर 2020 रोजी देशात या प्रकरणांची संख्या एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी 4 मे रोजी कोरोनाबाधितांचा आकडा दोन कोटी आणि 23 जून 2021 रोजी हाच आकडा 3 कोटींवर पोहोचला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी