Coronavirus live: देशात संक्रमित रुग्णांची संख्या ५६, इराणमध्ये फसलेले भारतीयांची घरवापसी 

Coronavirus live updates : कोरोना व्हायरसने जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना आतापर्यंत जगात एकूण ४ हजार जणांनी प्राण गमावला आहे. यामुळे सुमारे १ लाख १० जणांना या आजाराची बाधा झाली आहे. 

coronavirus news live updates first batch of indian pilgrims came home from iran as death toll crosses four thousand worldwide
Coronavirus live: देशात संक्रमित रुग्णांची संख्या ५६, इराणमध्ये फसलेले भारतीयांची घरवापसी   |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जगभरात ४ हजारांच्या पार गेली आहे. यामुळे सुमारे १ लाख १० जणांना या आजाराची बाधा झाली आहे.  या दरम्यान इराणवरून भारतीय भाविकांचा एक गट भारतात पोहचला. भारतीय लष्कराच्या विमानाने ५८ जणांना मायदेशी आणण्यात आले. चीननंतर कोरोना व्हायरस इराणमध्ये आपले हातपाय पसरत आहेत. या ठिकाणी आज एका दिवसात ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण संख्या २३७ वर पोहचली आहे. या आजाराने इराणमध्ये ७ हजार १६१ जणांना बाधा झाली आहे. 

देशात संक्रमित जणांची संख्या ५६ झाली 

केरळ आणि कर्नाटकातून कोरोना व्हायरसचे ९ प्रकरणं समोर आली आहेत. त्यानंतर या आजाराने ग्रस्त झालेल्यांची संख्या वाढून ५६ झाली आहे.  यापूर्वी सोमवारी ८ प्रकरणं समोर आली होती. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळमध्ये ३ वर्षांच्या मुलीला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

केरळमध्ये नवीन ६ प्रकरणं 

केरळमध्ये कोरोना व्हायरसचे आणखी ६ प्रकरणं समोर आली आहेत. यामुळे संक्रमित रुग्णांची संख्या राज्यात १२ झाली आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता. राज्यातील सर्व एएटर्स ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात आली आहेत. तसेच ७ वी पर्यंतच्या शाळा आणि परीक्षा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी