टेन्शन वाढलं ! भारतासाठी पुढील 40 दिवस महत्त्वाचे; कोरोनाची लाट येण्याची शक्यता

Coronavirus : कोरोना विषाणूचा  संसर्ग (infection) वाढू लागला आहे. भारतातही पुन्हा कोरोनाची लाट (Covid19 Wave)येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटी भारतात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

Possibility of corona wave  in Next 40 days
पुढील 40 दिवसात कोरोनाची लाट येण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जानेवारी महिन्याच्या शेवटी भारतात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
  • चीनपासून, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान या देशांत नवीन कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत.
  • पूर्व आशियामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर भारतात तीन दिवसांनी कोरोनाची लाट येत असते.

Coronavirus Outbreak In India : जगभरात कोरोना विषाणूचा  संसर्ग (infection) वाढू लागला आहे. भारतातही पुन्हा कोरोनाची लाट (Covid19 Wave)येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटी भारतात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास भारतात पुढील 40 दिवसात कोरोनाची मोठी लाट येणाचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.(Coronavirus : Next 40 days important for India; Possibility of corona wave )

 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हे पुढील 40 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या दिवसात लाटेबाबतचं चित्रं स्पष्ट होईल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे. जगभरात चीन, जपान, ब्रिटन, ब्राझील, इटली आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. मात्र, आतापर्यंत भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे.

अधिक वाचा  : तुनिषाचा मृतदेह पाहून आईची शुद्ध हरपली

भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. पण, आता मात्र परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे भारतातील कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'एअर सुविधा' फॉर्म भरणे आणि 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली जाणार आहे. 

अधिक वाचा  :सलमान खानच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं फटक्याचं गिफ्ट

यावेळी भारतात येते कोरोनाची लाट 

 पूर्व आशियामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर भारतात कोरोनाची नवीन लाट 30 ते 35 दिवसांनी येते. ही माहिती याआधी भारतात आधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालामध्ये समोर आली आहे. आता कोरोनाच्या नव्या लाटेने पूर्व आशियाई देशांमध्ये जोर पकडला आहे. चीनपासून, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान या देशांत नवीन कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. या आधारावर, जानेवारीच्या अखेरीस भारतात नवीन रुग्णणांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी