Corona Virus & Lockdown LIVE Updates: कोरोना बाधितांची संख्या 6412, तर 169 लोकांचा मृत्यू

कोरोना व्हायरसची लागण वेगानं पसरत चालली आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. 21 दिवसांच्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनचा आज 17 वा दिवस आहे. जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स. 

Corona Virus & Lockdown LIVE Updates
कोरोना बाधितांची संख्या 6412, तर 169 लोकांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे.
 • 21 दिवसांच्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनचा आज 17 वा दिवस आहे.  
 • अनेक शहरांमध्ये नागरिकांना मास्क घातलं अनिवार्य केलं आहे.

नवी दिल्लीः जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच देशातही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होतेय. 21 दिवसांच्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनचा आज 17 वा दिवस आहे.  अनेक शहरांमध्ये नागरिकांना मास्क घातलं अनिवार्य केलं आहे. तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकारही आपआपल्या परीनं वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 6 हजारच्या पार पोहचली आहे. येथे जाणून घ्या कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन संदर्भातले प्रत्येक अपडेट्स. 

Corona Virus & Lockdown LIVE Updates

 1. 35 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातील सामान्य रुग्णालयातील 3 डॉक्टरांसह 27 नर्सचादेखील समावेश आहे अशी माहिती सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ.हितेश महाले यांनी दिली आहे.
 2. नाशिकमध्येही कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.  नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या 12 वर गेली आहे.
 3. नागपूरमध्येही 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह, सतरंजीपुरा भागातील मृत्यु झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह 68 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबातील 6 व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 4. पुण्यातील 14, मुंबईत 9 तर मालेगाव आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा आता 97 वर पोहोचला आहे.
 5. प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 30766 नमुन्यांपैकी 28865 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. 
 6. पुणे शहरात 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 11 रुग्ण नायडू रुग्णालयात तर 4 जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या 190 झाली असून जिल्ह्यातील संख्या 225 झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 
 7. रत्नागिरी जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली. जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला  आज डिस्चार्ज दिला. त्यानंतर साखरतर या गावातील आणखी एका महिलेचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.संबंधित महिला ही साखरतर येथील कोरोनाबाधित रूग्णाची नातेवाईक आहे. 
 8. कोरोना बाधितांची संख्या 6412, तर 169 लोकांचा मृत्यू
 9. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 88 हजार 981 जणांचा मृत्यू झाला.  192 देशांमधील 15 लाख 19 हजार 260 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन लाख 12 हजार 100 जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. 
 10. युरोपमध्ये सात लाख 87 हजार 744 जणांना लागण झाली असून आतापर्यंत 62 हजार 402  जणांचा मृत्यू झाला आहे.
 11. महाराष्ट्रात सर्वाधिक 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 12. दिल्लीमध्ये 9, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
 13. मागील 24 तासांत देशांत झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात आठ, गुजरात आणि मद्यप्रदेशात प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मिरमध्ये दोन तसेच पंजाब, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 
 14. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता.
 15. पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामध्ये प्रत्येकी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेश, जम्मू कश्मीर आणि उत्तरप्रदेशमधून प्रत्येकी चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
 16. रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला गुरूवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. मुळचा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावचा असलेला दुबईहून आलेला 50 वर्षीय इसम हा कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं.
 17. इंग्लंडमध्ये काल कोरोनाने तिथे 881 लोकांचा जीव घेतला, तिथला बळीचा आकडा 7978 वर पोहोचला आहे.
 18. फ्रान्सने काल दिवसभरात 1341 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 12हजार 210 बळी, एकूण रुग्ण 1 लाख 18 हजार
 19. स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 655लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 15 हजार 447
 20. न्यूयॉर्क प्रांतात काल 799बळी, तिथे रुग्णांची संख्या 1लाख 62हजार तर एकूण मृतांचा आकडा 7068.
 21. गेल्या 7 दिवसात अमेरिकेत कोरोनाचे तब्बल 10 हजार 601 बळी गेले आहेत. 
 22. तर तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजुून जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. 
 23. कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे.
 24. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे.
 25. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 591 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 26. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 27. देशात कोरोना व्हायरसमुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी