Coronavirus vaccine: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी, आपात्कालीन परिस्थितीत वापरता येणार

कोरोना विरुद्धाच्या लढ्याला अजून धार येणार आहे. जगात घोंघवणाऱ्या या संकटाला मात देण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे.

Coronavirus vaccine Another vaccine
Coronavirus vaccine: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जागतिक आरोग्य संघटनेकडून मॉडर्नाच्या लशीला मंजुरी
  • आपात्कालीन परिस्थितीत वापरता येणार मॉडर्नाची लस
  • सिमोफार्मा आणि सिनोवॅक या नव्या लसी पण येणार बाजारात

जिनिव्हा: कोरोना विरुद्धाच्या लढ्याला अजून धार येणार आहे. जगात घोंघवणाऱ्या या संकटाला मात देण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी सध्या बाजारात विविध लशी आल्या आहेत. त्यात आता अजून एक लस आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मॉडर्ना (Moderna) च्या लशीला मंजुरी दिली आहे. मॉडर्नाची लस आपात्कालीन (Emergency) परिस्थितीत वापराची मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत एस्ट्राजेनका, फायजर-बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सच्या लशीला आपात्कालीन परिस्थितीतील वापरासाठी मंजुरी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, आगामी काही दिवसांमध्ये सिमोफार्मा आणि सिनोवॅक या लशींनाही अशाच प्रकारची मंजुरी देण्यात येणार आहे. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी लशीला मंजुरी देण्यात आली. कंपनीच्यावतीने जागतिक आरोग्य संघटनेला आकडेवारी उपलब्ध करून देण्यास उशीर झाला असल्याचे सीईओ स्टिफन बानसेल यांनी म्हटले.जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली मॉडर्ना ही पाचवी लस ठरली आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने डिसेंबर २०२० मध्ये मॉडर्नाच्या लशीला आपात्कालीन परिस्थितीत वापरण्याची परवानगी दिली होती. 

दरम्यान, भारतात रशियाने विकसित केलेली 'स्पुटनिक व्ही' लस दाखल झाली आहे. लशीची पहिली खेप दाखल झाल्यामुळे भारतातील लसीकरणाला काही प्रमाणात वेग येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 'स्पुटनिक व्ही' ही भारतातील पहिली परदेशी ठरणार आहे. स्पुटनिक लशीचे उत्पादन भारतातही करण्यात येणार आहे.
जगभरातील देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. भारतात करोनाची दुसरी लाट आली असताना ब्राझीलमध्ये ही कोरोनाचे थैमान सुरू आहे. ब्राझीलमध्ये एकाच महिन्यात तब्बल एक लाख कोरोना बळींची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये आता एकूण करोना बळींची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. जगात सर्वाधिक कोरोना बळींची नोंद अमेरिकेत झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी