अटक केलेलं प्रेमी जोडपं चक्क पोलिसांच्याच गाडीत करत होते सेक्स!

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 18, 2019 | 20:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

फ्लोरिडामध्ये एक प्रेमी युगल हे पोलिसांच्याच कारमध्ये सेक्स करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.  

GettyImages_Police
अटक केलेलं प्रेमी जोडपं चक्क पोलिसांच्याच गाडीत करत होते सेक्स! (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • दारुच्या नशेत असणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी केली अटक
  • पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचाच गाडीत सेक्स करताना आढळलं जोडपं
  • याआधीही पोलिसांनी या जोडप्याला केलं होतं अटक

फ्लोरिडा: फ्लोरिडामध्ये एक अतिशय हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने एका प्रेमी जोडप्याला दारुच्या नशेत गाडी चालवित असल्याच्या संशयावरुन अटक केली होती. अटक केल्यानंतर दोघांनाही त्याने पोलिसांच्या गाडीत बसवलं. पण यानंतर जे काही झालं त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. कारण की, पोलिसांच्याच गाडीत हे प्रेमी जोडपं थेट सेक्स करत असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांनी या जोडप्याला डीयूआयच्या अंतर्गंत थेट तुरुंगात डांबलं. 

नासाउ काउंटीने आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, ३१ वर्षीय आरोन थॉमस आणि ३५ वर्षीय मेघन मोंडानारो हे हेडलाइट सुरु न करता बाइक चालवत होते. याचवेळी दोघेही दारुच्या नशेत होते. तेव्हा त्यांनी नशेतच एका कारला टक्कर दिली. याच वेळी पोलिसांनी दोघांनाही दक्षिण फ्लेचर एवेन्यू येथे अटक केली. यानंतर या जोडप्याला कळालं की, आपण नशेत आहोत. अटक केल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही आपल्या गाडीच्या मागच्या बाजूला बसण्यास सांगितलं. 

जेव्हा पोलीस आपल्या कारच्या बाहेर उभे होते तेव्हाच थॉमस आणि मोंडानारो यांनी थेट कारमध्येच आपले कपडे उतरविण्यास सुरुवात केली. याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, 'आम्ही जेव्हा त्यांना (जोडप्याला) रोखण्यासाठी कारचा दरवाजा उघडला त्यावेळी थॉमस नग्न अवस्थेत होते. त्यामुळे आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न करुन कारमधून बाहेर काढलं. पण तो तिथून थेट पळून गेला.' 

पण पोलिसांनी थॉमसला जवळच्याच पार्किंग परिसरातून ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांनी थॉमसवर डीयूआयशिवाय इतर गुन्हे देखील दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, थॉमस आणि मोंडानारो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. मोंडानोराला जामीन मिळवायचा असल्यास तब्बल १२ हजार ५०८ डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. तर थॉमसला मात्र कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. 

दरम्यान याआधी देखील या जोडप्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे थॉमस आणि मोंडोनारो यांच्यासाठी जेल ही काही नवी गोष्ट नाही. याआधी मोंडानारो हिला पॅरोलचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. त्यावेळी तिला तब्बल ६० दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. दुसरीकडे थॉमसला देखील कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यालाही ४६ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा या उठाठेवी जोडप्याला तुरुंगात जावं लागलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...