Vaccination : १२ ते १८ वयोगटातील मुलांचे होणार लसीकरण, DGCI कडून भारत बायोटेकच्या लसीला मंजूरी

vaccination of teenage  देशभरासह संपूर्ण जगात ओमिक्रॉनचे संकट वाढत आहे. या पार्श्वभूमीवर DGCI  १२ ते १८ वयोगटील मुलांसाठी भारत बायोटेकच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. कोरोना संकट वाढता या बद्दल चर्चा सुरू होती. अखेर आज त्यावर निर्णय घेण्यात आला आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • देशभरासह संपूर्ण जगात ओमिक्रॉनचे संकट वाढत आहे.
  • DGCI  १२ ते १८ वयोगटील मुलांसाठी भारत बायोटेकच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.
  • जानेवारी महिन्यात बाजरात येण्याची शक्यता आहे.

Vaccination : नवी दिल्ली :  देशभरासह संपूर्ण जगात ओमिक्रॉनचे संकट वाढत आहे. या पार्श्वभूमीवर DGCI  १२ ते १८ वयोगटील मुलांसाठी भारत बायोटेकच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना या बद्दल चर्चा सुरू होती. अखेर आज त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणासाठी भारत बायोटेकच्या ज्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे, जानेवारी महिन्यात बाजरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर किशोरवयीन मुलांना ही लस देण्यात येईल. (Covid 19 Omicron Bharat Biotech vaccine gets approval for emergency use for kids aged between 12 and 18 years by DGCI)

ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ

देशभरात आतापर्यंत ४१५ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. देशात ओमिक्रॉन नंतर कोरोनाचेही रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांत नाईट कर्फ्यू आणि इतर निर्बंध लावण्यास आले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यात जमवाबंदी लागू करण्यात आली आहे.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी