लॉकडाऊनच्या घोषणेनंतर NPR आणि जनगणनेचं काम स्थगित

देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे एनपीआर आणि जनगणना ही दोन्ही कामे पुढील आदेशपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. 

covid 19 outbreak the first phase of census 2021 and the updation of national Population Register postponed until further orders 
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर NPR आणि जनगणनेचं काम स्थगित  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली:  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अपडेट करणे आणि २०२१ च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज हे आता पुढे ढकलण्यात आलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यापूर्वी जनगणना आणि  एनपीआर ही दोन्ही कामे १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान होणार होती. मात्र आता पुढील आदेश मिळेपर्यंत या दोन्ही गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  

गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सद्यस्थिती लक्षात घेता पुढील आदेश येईपर्यंत एनपीआर व जनगणनाचे काम थांबविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसवर मात करता यावी यासाठी  मंगळवारपासून देशात २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अभूतपूर्व पाऊल उचलले आणि देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केले. यानंतर केंद्र सरकारने स्पष्ट केलं की, या कालावधीत रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवा स्थगित राहतील.

कोरोना व्हायरसमुळे चिघळत चाललेली परिस्थिती लक्षात घेता आज (२४ मार्च २०२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी असं जाहीर   केलं की, 'मंगळवार रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यूच आहे.' अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली होती. 'घरातून बाहेर न पडणं हाच आज कोरोनावरचा उपाय आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस आपण कुणीही घरातून बाहेर पडू नका.' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अत्यंत कळकळीचं आवाहन केलं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...