India's Covid New Guidelines : परदेशातून येणाऱ्यांसाठी भारत सरकारच्या गाईडलाईन्स

covid new guidelines rules in marathi for international arrivals in india : चीन पाठोपाठ अमेरिकेसह आणखी काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या बदलत्या परिस्थितीची दखल घेऊन भारत सरकारने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्यांसाठी गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत.

Covid guidelines for international arrivals
परदेशातून भारतात येणाऱ्यांसाठी गाईडलाईन्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • परदेशातून येणाऱ्यांसाठी भारत सरकारच्या गाईडलाईन्स
  • कोविड प्रतिबंधात्मक लसचे किमान दोन डोस घेतले असणे आवश्यक
  • मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर पाळणे (सोशल डिस्टन्स) चांगले

covid new guidelines rules in marathi for international arrivals in india : चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी स्मशानात अंत्यसंस्कारांसाठी आणि हॉस्पिटलमध्ये बेडसाठी वेटिंग आहे. चीन पाठोपाठ अमेरिकेसह आणखी काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या बदलत्या परिस्थितीची दखल घेऊन भारत सरकारने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्यांसाठी गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येकाला या गाईडलाईन्सचे पालन करावे लागेल. गाईडलाईन्स विमानतळ (Airport), बंदर (पोर्ट / Port) आणि जमिनीच्या मार्गाने सीमा ओलांडून भारतात येणाऱ्यांसाठी आहेत. या गाईडलाईन्स शनिवार 24 डिसेंबर 2022 पासून लागू होतील. 

एका विमानातून आलेल्या एकूण प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांच्या रँडम कोविड टेस्ट केल्या जातील. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास सविस्तर चाचणीची प्रक्रिया प्रयोगशाळेच्या (लॅब / Lab) मदतीने राबविली जाईल. या प्रक्रियेतही पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित व्यक्तीला होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक  क्वारंटाईनमध्ये ठेवून त्याच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले जातील.

भारत-बांगलादेश दुसरी टेस्ट LIVE स्कोअर

विमानतळ (Airport), बंदर (पोर्ट / Port) आणि जमिनीवरील सीमा भागातले चौकी पहारे या ठिकाणी पहिल्या कोविड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीची लॅब टेस्ट केली जाईल. तसेच याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला माहिती दिली जाईल. लॅबमधील टेस्टचा रिपोर्ट येताच त्याची माहिती पण राज्य आणि केंद्र सरकारला दिली जाईल. 

ज्यांची लॅब टेस्ट पण पॉझिटिव्ह येईल त्यांच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्स केले जाईल. कोरोना विषाणूच्या कोणत्या अवताराची बाधा झाली आहे आणि त्याचे शरीरावर झालेले परिणाम यांचा आढावा घेतला जाईल. 

चीनमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला गाईडलाईन्स बाबतचे पत्र पाठवले आहे.

कोरोनाचा BF.7 व्हेरिएंट आणि त्याची लक्षणे

थंडीत लहान मुलांसाठी 'या' टिप्स वापरा

पेरू खा, निरोगी आणि उत्साही राहा

परदेशातून भारतात येणाऱ्यांसाठी गाईडलाईन्स (Covid guidelines for international arrivals)

  1. परदेशातून भारतात येणाऱ्याने कोविड प्रतिबंधात्मक लसचे किमान दोन डोस घेतले असणे आवश्यक आहे
  2. मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर पाळणे (सोशल डिस्टन्स) चांगले. 
  3. प्रवासादरम्यान आजारी आढळलेल्यांवर लगेच वैद्यकीय उपचार करणे आवश्यक
  4. लक्षणे आढळलेल्या प्रवाशाला लगेच इतरांपासून वेगळे करणे आणि संबंधित व्यक्तीवर वेळेत वैद्यकीय उपचार सुरू करणे आवश्यक तसेच उपचारांसाठी आवश्यकतेनुसार कोविड रुग्णांच्या कक्षात दाखल करणे आवश्यक
  5. परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग आवश्यक
  6. लक्षणे असलेल्या प्रवाशांना ताबडतोब वेगळे केले जावे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी