कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोना चाचणीची गरज नाही! केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना

ICMR New Guidelines For Testing : देशात कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस होत वाढत आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून (Central Government) कोरोना चाचणीबाबत (Corona Test) नवी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.

ICMR New Guidlines For Testing
कोणाला करुन घ्यावी लागेल कोरोना चाचणी; नवीन सूचना वाचली का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रुग्ण संपर्कातील व्यक्ती अतिजोखमीच्या गटातील नसेल तर त्यास कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असा दिलासादायक निर्णय केंद्राने घेतला आह़े.
  • रुग्ण संपर्कातील व्यक्ती वयोवृध्द अणि सहव्याधीग्रस्त नसेल तर चाचणी करण्याची गरज नाही़.

Covid Testing New Guidelines  : नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस होत वाढत आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून (Central Government) कोरोना चाचणीबाबत (Corona Test) नवी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग आणि टेरेसिंग वाढवण्यावर प्रशासन भर देत असतो. कोरोना चाचणीविषयी केंद्र सरकारने नवीन सुचना जारी केली आहे. कोरोना रुग्ण संपर्कातील व्यक्ती अतिजोखमीच्या गटातील नसेल तर त्यास कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असा दिलासादायक निर्णय केंद्राने घेतला आह़े. 

कोरोना चाचण्यांसंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत़. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही चाचणी करावी लागते मात्र, रुग्ण संपर्कातील व्यक्ती वयोवृध्द अणि सहव्याधीग्रस्त नसेल तर चाचणी करण्याची गरज नाही़ तसेच आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक नाही, असे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केल़े आहे. 

ICMR च्या मार्गदर्शक तत्वे काय?

तत्त्पूर्वी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रुग्णांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या़ त्यानुसार कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बाधित असल्याचे आढळल्यानंतर सातव्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणे शक्य होणार आहे. रुग्ण बाधित आल्यानंतर सलग तीन दिवस त्याला ताप नसेल तर चाचणी न करता त्याला घरी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णांना घरी सोडल्यानंतर पुढील सात दिवस त्यांनी आपल्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच घरी राहतानाही मास्कचा वापर करावा. घरी सोडल्यानंतर ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण यांपैकी कोणतेही लक्षण सौम्य किंवा तीव्र स्वरूपात जाणवल्यास त्या रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी सलग तीन दिवस 93 आणि त्याहून अधिक राहिल्यास त्या रुग्णांना घरी सोडण्यात यावे, असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. यातही जी व्यक्ती 60 वर्षापुढील आहे किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसात त्रास किंवा त्यासंबंधी आजार असेल तर त्यांना कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. रुग्णालयांसाठीही आयसीएमआरकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन स्थितीत कोरोना चाचणीसाठी उशीर करू नये.आयसीएमआरनुसार रविवारी देशभरात 13.52 लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली. देशात कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर आतापर्यंत 69.16 कोटीपेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

कोणत्या व्यक्तींना कोरोना चाचणीची गरज नाही?

सार्वजनिक ठिकाणी राहणारे लक्षणं नसलेले लोक
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले पण ज्यांना जास्त धोका नाही. म्हणजे ज्याचं वय जास्त आहे, आजारी नाहीत असे व्यक्ती
होम आयसोलेशनच्या गाईडलाईन्सनुसार डिस्चार्ज मिळालेले लोक
रुग्णालयाच्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार कोरोना केंद्रातून डिस्चार्ज मिळालेले लोक
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणारे नागरिक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी