Covid Vaccine Price: कोविड लसीच्या एका डोसची किंमत 'इतके' रुपये असण्याची शक्यता

Covid Vaccine Price: देशभरात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच खासगी रुग्णालयांतही लस उपलब्ध होणार असून त्याची किंमत किती असणार याबाबत सूत्रांकडून माहिती समोर आली आहे.

Corona Vaccination
कोरोना लस   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियान संपूर्ण देशभरात सुरू
  • शुक्रवारपर्यंत देशभरात १.३४ कोटींहून अधिक नागरिकांना देण्यात आली लस

Covid Vaccine Price: देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू आहे. १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली जाणार असून यामध्ये ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पुढील टप्प्यात खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी सरकारकडून देण्यात येण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने या संदर्भात उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांची नोंदणी करण्यापासून ते पडताळणीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर चर्चा झाली आहे. 

६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार

१ मार्चपासून देशभरात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. यासोबतच ४५ ते ६० वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही लस देण्यात येणार आहे. मात्र, हे आजार नेमके कुठले आहेत याबाबत अद्याप सरकारने सविस्तर माहिती दिलेली नाहीये. 

२५० रुपये एका डोसची किंमत?

१० हजार शासकीय लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांतील किमतीबद्दल अद्यापही सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मात्र रिपोर्ट्सनुसार, खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये लसीकरण केंद्र बनवण्यासाठी १०० रुपये आणि लसीची किंमत १५० रुपये असणार आहे. खासगी रुग्णालयांत लसीकरण सुरुवात झाल्यास लसीकरणाच्या मोहिमेला आणखी वेग येईल.

भारतात आतापर्यंत १.३४ कोटींहून अधिक नागरिकांना लस दिली

२६ फेब्रुवारी २०२१च्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचा आकडा १.३४ कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत २,७८,९१५ सत्रांमध्ये १,३४,७२,६४३ जणांना लस देण्यात आळी आहे. यामध्ये ६६,२१,४१८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर २०,३२,९९४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आली आहे. तर ४८,१८,२३१ फ्रंट लाईन वर्कर्सला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी