मुंबई : भारतात कोरोना लसीकरणाची तयारी (Preparation of covid vaccination) जवळजवळ पूर्ण झाली आहे. सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही काढल्या आहेत. भारतात लवकरच लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात सहा ते आठ महिन्यांत जवळपास ३० कोटी नागरिकांना कोविड लस (Covid-19 vaccine) दिली जाईल.
कोविड१९ लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्याअंतर्गत एका दिवसात प्रत्येक सत्रात १०० ते २०० जणांना लस देण्यात येईल. लस दिल्यावर नागरिकांना ३० मिनिटे तेथेच थांबावे लागेल. एका वेळी फक्त एका व्यक्तीलाच लसीकरणाच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे.
कोरोनावरील लस बाजारात कधी उपलब्ध होईल?, लसीकरण कधी सुरू होईल? आपल्याला कोरोनाची लस कशी दिली जाणार? अशा प्रकारचे विविध प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत.
कोरोना लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. विविध कंपन्यांच्या लसी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. भारत सरकार लवकरच कोविड-१९ लसीला मंजूरी देईल आणि त्यानंतर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही केंद्र सरकारच्या www.mohfw.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
एकावेळी एका रूममध्ये १०० जणांना लस दिली जाणार आहे. ही लस दिल्यावर त्या नागरिकांना एका रूममध्ये ३० मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना कोणताही त्रास होत नसल्यास घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
भारत सरकारने कोरोना लसीकरणाला परवानगी दिल्यावर सर्वाधिक धोका असणाऱ्यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे.
कोविड-१९ लस घेणे बंधनकारक नसले तरी स्वत:च्या सुरक्षेसाठी लस घेणे योग्य ठरेल. या लसीकरणाच्या माध्यमातून तुम्ही या रोगाचा प्रसार रोखाल आणि कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक, सहकाऱ्यांसह इतर नागरिकांपर्यंत कोरोनाचा प्रसार होणे रोखाल.
होय, आजारातून बरे झालेल्या व्यक्तीला कोरोना वॅक्सिनचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. भलेही तो व्यक्ती कोरोनामुक्त झाला असेल तरी त्याने लस घेतली तर त्यामुळे त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल.
होय, भारतात दिली जाणारी लस ही तितकीच प्रभावी असणार आहे जी इतर देशांत दिली जात आहे. या लसीची सुरक्षा आणि कार्यक्षमता निश्चित केल्यावरच केंद्र सरकारकडून लसीकरणाला मान्यता देईल.
नोंदणीच्या वेळी फोटो आयडीसह खाली नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्रे आवश्यक असेल.
लसीकरण केंद्रावर ज्या व्यक्तीला लस द्यायची आहे त्याच्याकडे फोटो आयडी, कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी आणि पडताळणी करण्यात येईल आणि त्यानंतर लस देण्यात येईल. ज्यामुळे लस दिल्याची खात्री होईल आणि नोंदही ठेवली जाईल.
ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थी व्यक्तीच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लस देण्यात येणार असलेली तारीख, स्थळ, वेळ या संदर्भात एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.
होय, निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मतदानासाठी ज्याप्रकारे बूथ असोत तसे बूथ लसीकरणासाठी करण्यात येणार आहेत आणि लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला त्या बूथमध्ये ओळखपत्र तपासन प्रवेश दिला जाईल. लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र देखील पाठवण्यात येणार आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व्यवस्था करण्यात येणार आहे. फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालये, शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी तर तिसऱ्या गटातील व्यक्तींना लसीकरणासाठी दवाखाने, शाळा, समाजमदिर, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली जाईल.