Booster Dose : कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोसच्या दरांत घट, जाणून घ्या नवीन दर

उद्या रविवारपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस लागण्यास सुरूवात होणार आहे. त्या आधीच कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन या दोनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दर कमी झाले आहेत.

vaccine
कोरोना प्रतिबंधक लस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्या रविवारपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस लागण्यास सुरूवात होणार आहे.
  • त्या आधीच कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दर कमी झाले आहेत.
  • कोविशील्ड बूस्टर डोसची किंमत ६०० रुपये इतकी होती.

Booster Dose : नवी दिल्ली : उद्या रविवारपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस लागण्यास सुरूवात होणार आहे. त्या आधीच कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दर कमी झाले आहेत. 

शनिवारी कोविशील्ड आणि कोवॅक्सीनने आपल्या बूस्टर डोसच्या दरात मोठ्या प्रमाणात घट केली आहे. याधी कोविशील्ड बूस्टर डोसची किंमत ६०० रुपये इतकी होती. आज कोविशील्डची किंमत्ग २२५ रुपये इतकी झाली आहे. कोवॅक्सीनची प्रति डोस किंमत यापूर्वी १२०० रुपये इतकी होती, त्यात घट होऊन २२५ रुपये करण्यात आली आहे. 

नुकतंच केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने १८ ते ५९ वयोगटातील लोकांसाठी बूस्टर डोस संदर्भात राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बैठकीत खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस बूस्टर डोसचे दर १५० रुपये ठरवले होते. 


केंद्र सरकारने १० एप्रिल पासून खासगी रुग्णालयात १८ वर्षाहून अधिक असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेऊन ९ महिने झाले आहेत त्यांनाच बूस्ट डोस देण्यात येणार आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच कोविन वेबसाईटवर बुकिंग स्लॉट सुरू होणार आहे. कोरोना विरोधात लढाई आणखी मजबूत होणार आहे असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी