धक्कादायक! १९ वर्षांच्या IIT विद्यार्थ्याने ५० पेक्षा जास्त मुलींचे आयुष्य केले बरबाद!

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)खडगपूर येथे शिकणाऱ्या महावीरने ५० पेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना टार्गेट केले होते. महावीर कुमारचा हा कारनामा पाहून सर्वानाच धक्का बसला आहे.

Crime by IIT Kharagpur Student
आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिंनी आणि शिक्षिकांना त्रास 

थोडं पण कामाचं

  • आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने अनेक तरुणींचे आयुष्य बरबाद केले
  • विद्यार्थींना आणि शिक्षिकांना देत होता त्रास
  • व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज येत होते आणि सोशल मीडियावर (Social Media) मॉर्फ्ड फोटो

नवी दिल्ली: आयआयटी म्हटले की देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था, हुशार विद्यार्थी, तंत्रज्ञानातील प्रगती अशा बाबी डोळ्यासमोर येतात. मात्र आयआयटीच्याच (IIT Student)एका विद्यार्थ्याने अनेक तरुणींचे आयुष्य बरबाद केले आहे. दोन महिन्यांआधी ८ ऑगस्टला दिल्ली पोलिसांकडे एक तक्रार आली. उत्तर दिल्लीतील एका शाळेतील मुलींना आणि शिक्षिकांना कोणीतरी ऑनलाइन (Online classes) त्रास देत होता. व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज येत होते आणि सोशल मीडियावर (Social Media) मॉर्फ्ड फोटो पाठवले जात होते. शिक्षिकांना इंटरनॅशनल नंबरवरून घाणेरडे कॉल्स येत होते. कोणीतरी विद्यार्थींना आणि शिक्षिकांना त्रास देत होते. ऑनलाइन क्लासेसच्या वेळेस कोणतीही विनापरवानगी घुसघोरी करत होते. शाळेने तक्रार केल्यानंतर सायबर सेलने याचा तपास सुरू केला. (Crime:  A 19 years old IIT student stalked the teachers & students on social media)

आयआयटीच्या विद्यार्थ्याचा घाणेरडा प्रकार

या सर्व प्रकारामागे एक १९ वर्षांचा मुलगा सापडला. त्याचे नाव आहे महावीर कुमार. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)खडगपूर येथे शिकणाऱ्या महावीरने ५० पेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना टार्गेट केले होते. महावीर कुमारचा हा कारनामा पाहून सर्वानाच धक्का बसला आहे. फक्त १९ वर्षांचा आयआयटीचा विद्यार्थी असा प्रकार करू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण जाते आहे. खरंतर महावीर कुमारला हे सर्व करताना मजा येत होती. त्यातूनच त्याचे एकेक पाऊल पुढे पडत होते.

हळूहळू महावीरला येऊ लागला मजा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास तीन वर्षांपूर्वी महावीरचा शाळेत शिकणाऱ्या एका मुलीशी ऑनलाइन संपर्क झाला होता. दोघांची मैत्री झाली आणि ती मुलगी महावीरला आवडू लागली. त्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर खोटे प्रोफाइल बनवून त्याच शाळेच्या इतर मुलींशी संपर्क केला. त्यानंतर महावीरने त्यांच्या फोटोमध्ये बदल करून मॉर्फ करून त्या मुलींना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. मुलींकडे त्याने शाळेच्या शिक्षिकांचा नंबर मागितला. ऑनलाइन क्लासेसमध्ये त्याने मुलींवर वेबलिंक शेअर करण्यासाठी दबाव आणला. महावीर ऑनलाइन क्लासेसच्या वेळेस अश्लील कंटेट शेअर करायचा. सुरूवातीला शाळेला वाटले की हे काही विद्यार्थ्यांचेच काम असून त्याविरुद्ध त्यांनी कारवाईदेखील केली. मात्र जेव्हा वारंवार हे प्रकार घडू लागले, तेव्हा शाळेने पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी शोधली महावीरची लोकेशन

शाळेने तक्रार नोंदवल्यानंतर आयपीसीअंतर्गत आणि पोक्सो (POCSO)तसेच आयची अॅक्टअंतर्गत पोलिसांनी केस दाखल केली. पोलिसांनी सांगितले की शाळेतून मिळालेल्या माहितीनुसार आणि हाती आलेल्या धाग्यांनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पीडित मुली, शिक्षिका आणि पालकांशी बोलल्यानंतर पोलिसांनी ३३ व्हॉट्सअॅप व्हर्च्युअल नंबर, ५ इंस्टाग्राम प्रोफाइल्स आणि फेक कॉलर आयडीद्वारे कॉलचा ठावठिकाणा शोधला. त्यानंतर पोलिसांनी व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेक ईमेल आयडीद्वारे आयपी डिटेल्स शोधले. त्यावरून त्यांना पाटण्यात राहणाऱ्या महावीर कुमारचा शोध लागला.

अॅप्सचा वापर करून मॉर्फ्ड फोटो सोशल मीडियावर टाकले

मोबाइल नंबरचा तपास करताना लक्षात आले की एका नंबरवरून एका पीडितेला तीन वर्षांपूर्वी एक कॉल आला होता. त्याच नंबर बनलेल्या प्रोफाइल्सवरून त्या मुलीचे फोटो मॉर्फ्ड करण्यात आले होते. पाटण्यातून अटक केल्यानंतर पोलिसांनी महावीरची चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा मान्य केला. महावीर आपली ओळख लपवण्यासाठी कॉलवर आपला आवाज बदलणारी अॅप्स वापरत होता. अॅपद्वारेच तो पीडितेला न्यूड फोटो पाठवायचा. त्यानंतर हे फोटो फेक इंस्टाग्राम प्रोफाइलवर अपलोड केले जायचे. महावीरच्या मोबाइलमधून अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. 

मजेसाठी केले सर्वकाही

पोलिसांना महावीरने दिलेल्या माहितीनुसार त्यान हे सर्वकाही मजा घेण्यासाठी केले. तो सोशल मीडियावरून अनेकांना मोबाइल नंबर सांगण्यासाठी ब्लॅकमेल करायचा. अर्थात यात त्याने कोणाकडूनही पैसे उकळलेले नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी