कैद्यांसमोरच जेलर करत होती कैद्याबरोबर सेक्स, पॅंटमध्ये करून ठेवले होते छिद्र, मिळाली ही शिक्षा

टीन गोंजालेजवर कैद्यांसमोर कैद्यबरोबर सेक्स करण्याचा आरोप होता. टीनाला ७ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्या तुरुंगात टीना जेलर होती आता त्याच तुरुंगात ती कैदी बनून २१० राहणार आहे.

Fresno County Jailor had sex with prisoner
फ्रेस्नो काउंटी जेलरचे कैद्याबरोबर लैंगिक संबंध 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) राज्यातील फ्रेस्नो काउंटी जेलमधील भयानक घटना
  • २७ वर्षांची जेलर टीना गोंजालेजला (Tina Gonzalez)झाली शिक्षा
  • ११ कैद्यांसमोर एका कैद्याशी ठेवत होती लैंगिक संबंध

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) राज्यातील फ्रेस्नो काउंटी जेलमधील (Fresno County Jail) २७ वर्षांची जेलर टीना गोंजालेजला (Tina Gonzalez)अलीकडेच शिक्षा सुनावण्यात आली आहे. टीन गोंजालेजवर कैद्यांसमोर कैद्यबरोबर सेक्स करण्याचा आरोप होता. टीनाला ७ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्या तुरुंगात टीना जेलर होती आता त्याच तुरुंगात ती कैदी बनून २१० राहणार आहे. टीना गोंजालेजने ११ कैद्यांसमोर एका कैद्याशी लैंगिक संबंध (Tina had sex with prisoner)ठेवले होते. एवढेच नव्हे तर कैद्याबरोबर सेक्स करणे सोपे जावे म्हणून तिथे आपल्या युनिफॉर्मच्या पॅंटला एक छिद्रदेखील करून ठेवले होते. फ्रेस्नो काउंटी शेरिफ कार्यालयाला डिसेंबर २०१९मध्ये कळवण्यात आले होते की एक पुरुष कैद्यी ज्याच्याकडे सेल फोन होता त्याचे टीना गोंजालेज सोबत लैंगिक संबंध आहेत. (California Jailor had sex with prisoner in front of other prisoners, sentenced 7 months imprisonment)

फ्रेस्नो काउंटी जेलमधील धक्कादायक घटना

फ्रेस्नो काउंटी शेरिफ कार्यालयाला ही माहिती मिळाल्यानंतर यासंदर्भातील चौकशी सुरू झाली. कैद्याची झडती घेतली असता तिथे पुराव्यासोबत एक सेल फोन देखील सापडला. यातून हे सिद्ध झाले की कैद्याचे टीना गोंजालेज या जेलरशी लैंगिक संबंध होते. त्यानंतर मे महिन्यात टीनाला अटक करण्यात आली. टीनाने २०१६ आणि २०१९च्या दरम्यान एक सुधार केंद्र अधिकारी म्हणूनदेखील काम केले होते. 

टीनाने कैद्याला दिला सेल फोन आणि ड्रग्स

टीना गोंजालेज ज्या कैद्याबरोबर लैंगिक संबंध ठेवत होती त्या कैद्याला तिने सेल फोन आणि ड्रग्स दिले होते. शिवाय ती त्या कैद्याला कैद्यांच्या होणाऱ्या तपासणीपासून संरक्षणदेखील देत होती. मागील महिन्यात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर न्यायमुर्ती इडियार्टने टीना गोंजालेजला म्हटले होते की, 'मला वाटते तुम्ही जे केले खूपच भयानक होते, मूर्खपणाचे होते आणि त्यामुळे करियर संपले आहे.'

या कारणामुळे केले सर्व

टीनाविरुद्ध खटल्याची सुनावणी सुरू असताना टीनाचा बचाव करणारे वकील मार्टिन टैलिसनिक यांनी म्हटले की 'जे घडले त्याची टीनाने जबाबदारी घेतली आहे. त्या काळात तिचा संसार संपुष्टात आला होता. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या कमकुवत झाली होती. त्यामुळे त्या नैराश्यातून तिने कैद्याशी लैंगिक संबंध ठेवले होते. तुरुंगातील कर्मचाऱ्यांना किंवा कैद्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा किंवा त्यांचे काही नुकसान करण्याचा तिचा अजिबात हेतू नव्हता.'

मी पाहिलेले आतापर्यतचे सर्वात घाणरडे कृत्य

फ्रेस्नो काउंटीचे सहाय्यक शेरिफ स्टीव्ह मॅककॉम यांनी या गुन्ह्याबद्दल म्हटले आहे की 'मी २६ वर्षांमध्ये शेरिफ कार्यालयात अनेक घृणास्पद आणि भयंकर कृत्ये पाहिली आहे. मात्र जेलमधील एका अधिकाऱ्याने जे कृत्य केले आहे ते सर्वात घृणास्पद आहे. एका कैद्याबरोबर लैंगिक संबंध ठेवणे, स्वत:च्या युनिफॉर्मच्या पॅंटमध्ये छिद्र करणे आणि ११ कैद्यांसमोर एका कैद्याशी सेक्स करणे असा विचार केवळ घाणेरड्या मेंदूतच येऊ शकतो. तिने जेलरची नोकरी स्वीकारताना जी शपथ घेतली होती ती तोडली आहे आणि आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांनादेखील संकटात ढकलले होते.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी