क्रिकेटर सुरेश रैनाच्या काकांचा खूनी ११ महिन्यांनी पोलिसांच्या अटकेत

Suresh Raina’s Uncle: सुरेश रैना याच्या आत्याच्या पतीची हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (STF)आणि पंजाब पोलिस (Punjab Police) यांच्या संयुक्त कारवाईमध्ये अटक करण्यात आली आहे.

Suresh Raina’s Uncle's Murder
सुरेश रैनाच्या जवळच्या नातेवाईकाचा खून 

थोडं पण कामाचं

  • आरोपी उत्तर प्रदेशातील बरेलीमधील बहेडी गावात लपून बसला होता
  • एसटीएफने पंजाब पोलिसांना दिली ही माहिती
  • छज्जू उर्फे छैमार नावाच्या आरोपीला त्याच्या गावातून अटक

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू सुरेश रैना याच्या आत्याच्या पतीची (Suresh Raina’s uncle murder)हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (STF)आणि पंजाब पोलिस (Punjab Police) यांच्या संयुक्त कारवाईमध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी खून केल्यानंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आपल्या गावात लपून छपून राहत होता. एसटीएफचे अपर पोलिस अधिक्षक सत्य सेन यादव यांनी सांगितले की एसटीएफच्या बरेली शाखेला यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पंजाबमधील पठाणकोटमधील क्रिकेटर सुरेश रैना (Cricketer Suresh Raina) यांच्या आत्याचे पती अशोक कुमार यांच्या घरी घुसून दरोडा घालणारा आणि अशोक कुमार (Ashok Kumar) यांचा खून करणाऱ्या टोळक्यातील एक सदस्य बरेली (Bareli) जिल्ह्यातील बहेडी पोलिस स्टेशन परिसरातील पचपेडा नावाच्या गावात लपून छपून राहतो आहे, अशी माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिस यांनी संयुक्तरिक्या ही कारवाई केली आहे. (Cricketer Suresh Raina’s uncle's murderer arrested by Uttar Pradesh STF after 11 months)

दरोडेखोरांच्या मारहाणीत झाला होता अशोक कुमार यांचा मृत्यू

एसटीएफचे अपर पोलिस अधिक्षक सत्य सेन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची खबर हाती लागल्यावर त्याची माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईमध्ये छज्जू उर्फ छैमार नावाच्या आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे क्रिकेटर सुरेश रैनाच्या आत्याचे पती अशोक कुमार यांच्या पठाणकोटमधील फरियाल गावातील घरात १९ ऑगस्ट २०२०च्या रात्री त्यांची हत्या झाली होती. त्या रात्री अशोक कुमार यांच्या घरात काही दरोडेखोर घुसले होते. त्यानंतर त्या दरोडेखोरांनी तिथे झोपलेल्या लोकांना दंडुक्याने मारहाण केली होती. यात अशोक कुमार गंभीररित्या जखमी झाले होते आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचा मुलगा कौशल कुमारचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता.

परिसरात महिलांबरोबर फिरून करायचे रेकी

छज्जू उर्फ छैमार याने चौकशीत एसटीएफला सांगितले की तो आणि त्याचे साथीदार मोहब्बत, शाहरुख, राशिद, आमिर आणि तीन महिलांसोबत शाहपूर कौडी पंजाबमध्ये राहून चादर आणि फूले विकायचे. एसटीएफला छज्जू उर्फ छैमार याने पुढे सांगितले की त्यांच्याकडे एक टेंपो होता ज्यातून ते या परिसरात महिलांसोबत फिरून रेकी करायचे. ज्या दिवशी क्रिकेटर सुरेश रैनाच्या आत्याचे पती अशोक कुमार यांच्या पठाणकोटमधील फरियाल गावातील घरातच हत्या झाली होती त्या दिवशी या दरोडेखोरांच्या टोळक्यातील महिला फूले विकण्याच्या निमित्ताने अशोक कुमार यांच्या घरात गेल्या आणि त्यांनी तिथली रेकी केली.

त्या रात्री काय झाले

दिवसभर अशोक कुमार यांच्या घराची रेकी केल्यानंतर त्या महिलांनी अशोक कुमार यांच्या घराची सर्व माहिती आपल्या दरोडेखोर साथीदारांना दिली. त्यानंतर या दरोडोखोरांच्या टोळक्याने त्या रात्री अशोक कुमार यांच्या घरावर दरोडा टाकला. तिथे त्यांनी घरातील लोकांना जबरदस्त मारहाण केली आणि घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन तेथून पळून गेले. या मारहाणीतच अशोक कुमार आणि त्यांचा मुलगा कौशल कुमार या दोघांचाही मृत्यू झाला होता. छज्जू उर्फ छैमार याने पुढे माहिती दिली की तो तेथून पळून हैदराबाद येथे गेला. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या बरेली जिल्ह्यातील गावी राहण्यास आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी