Crime | सातवीतील मुलाला क्लासमेटनेच धमकावले, दबावखाली स्वत:च्याच घरातील ५ लाख चोरण्यास पाडले भाग, खंडणीची तक्रार दाखल

Crime | मुलाने आपल्या वडिलांना सांगितले की त्याच्या वर्गातील एका मुलाने जबरदस्तीने त्याची पुस्तके ताब्यात घेतली आणि त्याला धमकावले. पुस्तके परत हवी असतील तर घरून पैसे आणण्यास सांगितले. पीडित मुलाला धमकावले की जर पैसे आणले नाही तर त्याला मारहाण करण्यात येईल.

Crime at Hyderabad
सातवीतील मुलाला धमकावले, ५ लाख चोरण्यासाठी पाडले भाग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरातील घटना
  • १३ वर्षीय आरोपीने आपल्याल वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला धमकावले आणि स्वत:च्याच घरात ५ लाख रुपयांची चोरी करण्यास भाग पाडले
  • या प्रकारात आरोपी मुलाचे कुटुंबिय सामील

Crime | हैदराबाद : शालेय विद्यार्थ्याला (School boy of 13 years) धमकावत त्याला स्वत:च्याच घरात चोरी करण्यास भाग पाडल्याची विचित्र घटना हैदराबाद (Banjara Hills, Hyderabad)येथील बंजारा हिल्स परिसरात घडली आहे. बंजारा हिल्स पोलिसांनी (Banjara Hills Police) यासंदर्भात खंडणीची तक्रार आरोपीविरुद्ध केली आहे. विशेष म्हणजे आरोपीदेखील फक्त १३ वर्षांचाच (Accused is minor) आहे. या आरोपीने आपल्याल वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला धमकावले आणि स्वत:च्याच घरात ५ लाख रुपयांची चोरी करण्यास भाग पाडले. चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. (Crime: Hyderabad, Class 7 boy threatened, forced to steal Rs 5 lakh, extortion case lodged against Accused)

सातवीच्या मुलाला धमकावले

जेव्हा सातवीतील विद्यार्थ्याच्या वडिलांना आढळले की त्यांनी घरात तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम गायब झाली आहे त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. विद्यार्थ्याचे वडील मेकॅनिक असून जुनी वाहने विकण्याचा व्यवसाय करतात. तिजोरीतून पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुटुंबियांकडे विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता त्याने आपण ते पैसे चोरल्याची आणि आपल्या वर्गातीलच एका मुलाला दिल्याची कबूली दिली. 

खंडणीचा गुन्हा दाखल, आरोपीचे कुटुंबिय सामील

हा प्रकार उघड झाल्याबरोबर त्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मुलाने आपल्या वडिलांना सांगितले की त्याच्या वर्गातील एका मुलाने जबरदस्तीने त्याची पुस्तके ताब्यात घेतली आणि त्याला धमकावले. पुस्तके परत हवी असतील तर घरून पैसे आणण्यास सांगितले. पीडित मुलाला धमकावले की जर पैसे आणले नाही तर त्याला मारहाण करण्यात येईल. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी १३ वर्षीय मुलाला खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली. आरोपीची बालकल्याण विभाग आणि त्याच्या कुटुंबियांसमोर तपासणी करण्यात आली. तपासात असे आढळून आले की आरोपी मुलाने चोरलेली रोख रक्कम आपल्या मामा आणि आईकडे दिली आहे.

बाल गुन्हेगारास कुटुंबाच्या ताब्यात दिले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोख रक्कम ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला बाल संरक्षण अधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकारच्या गुन्ह्यासाठी सात वर्षांपेक्षा कमी कालावधीची शिक्षा असल्याने आरोपीला कुटुंबियांकडे देण्यात आले. आयपीसीच्या कलम ४११ अतंर्गत आरोपी मुलाच्या दोन कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यता येणार आहे. या दोघांनी ती रोख रक्कम ताब्यात घेतली होती.

पीडीत मुलगा सातवीतील आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांना आढळले की त्यांनी घरात तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम गायब झाली आहे त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. विद्यार्थ्याचे वडील मेकॅनिक असून जुनी वाहने विकण्याचा व्यवसाय करतात. तिजोरीतून पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुटुंबियांकडे विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता त्याने आपण ते पैसे चोरल्याची आणि आपल्या वर्गातीलच एका मुलाला दिल्याची कबूली दिली वडिलांने दिल्या नंतर वडिलांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी