Crime | नात्याला कलंक, दारुड्या बापाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, भाडेकरूनेदेखील केला अत्याचार

Rape on Minor | मुलीच्या पोटात दुखू लागल्याने हा प्रकार समोर आला आहे. पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन मुलीची आजी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे गेल्यावर रेप झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीने आपल्या बापाने आणि भाडेकरून केलेल्या अत्याचाराची माहिती आजीला दिली.

Father raped the daughter
बापानेच मुलीवर केला बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नात्याला काळिमा फासणारी घटना, बापानेच केला बलात्कार
  • अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यावर प्रकार झाला उघड
  • भाडेकरूनदेखील केला बलात्कार, पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक

Rape on Minor | इंदूर : येथील खजराना येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर (Father Rape With Daughter) सात महिने रेप केला आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने हा प्रकार समोर आला आहे. पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन मुलीची आजी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे गेल्यावर रेप झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीने आपल्या बापाने आणि भाडेकरून केलेल्या अत्याचाराची माहिती आजीला दिली. सत्य समोर येताच मुलीच्या आजीने तिला घेऊन पोलिस स्टेशन (MP Police) गाठले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बापाला आणि भाडेकरूला आपापल्या कृत्याबद्दल माहित नव्हते. (Crime : In Indore, Father raped the daughter for 7 months)

बाप आणि भाडेकरूचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अतिशय घृणास्पद अशा या प्रकरणात एकीकडे बापच आपल्या मुलीवर बलात्कार करत होता तर दुसरीकडे त्यांचा भाडेकरूदेखील मुलीवर अत्याचार करत होता. ही मुलगी १५ वर्षांची आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर सतत ७ महिने अत्याचार होत होते. त्यानंतर पीडिता जेव्हा गर्भवती (Minor Pregnant) झाली त्यानंतर तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा खुलासा झाला आहे. खजराना पोलिस स्टेशनचे अधिकारी दिनेश वर्मा यांनी सांगितले की एक आजी आपल्या १५ वर्षांच्या नातीला घेऊन पोलिस स्टेशनला आल्या. त्यांनी आपली नात गर्भवती असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने बापाने आणि भाडेकरूने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. हे दोन्ही आरोपी मुलीला धमकावत होते.

१५ वर्षांची अल्पवयीन पीडिता झाली गर्भवती

समोर आलेल्या माहितीनुसार पीडिता ५ वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला होता. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिच्या कुटुंबाने घरातील एक खोली भाड्याने दिली होती. मुलीचा बाप दारुड्या आहे. काही महिन्यांपासून तो मुलीवर बलात्कार करत होता. त्यातच परिस्थितीचा फायदा घेऊन भाडेकरूदेखील मुलीवर अत्याचार करत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या भाडेकरूनेदेखील आपला गुन्हा मान्य केला आहे. त्याने सांगितले की मुलगी घरात एकटीच होती. हे पाहून मी तिच्यावर बलात्कार केला. शिवाय त्याने पीडितेला धमकावले देखील होते. हा सर्व धक्कादायक प्रकार पीडिता गर्भवती झाल्यावर समोर आला.

पोलिसांनी आरोपींना केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाडेकरूला याची कल्पना नव्हती की पीडितेचा बापदेखील तिच्यावर रेप करतो आहे. पीडिता घरात एकटीच असल्याचा फायदा घेत भाडेकरू सातत्याने तिच्यावर बलात्कार करत होता. तर पीडितेचा बाप दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार करत होता. पोलिसांनी या दोन्ही नराधमांना अटक केली आहे. सध्या पोलिस या दोघांकडे पुढील चौकशी करत आहेत. नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रकारामुळे परिसरातील लोक संताप व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी