धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवून मुलींवर केला सामूहिक बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 10, 2019 | 17:29 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सुपौल जिल्ह्यातील हुसैनाबाद गावात दोन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली असता, आरोपींचा तपास सुरू आहे.

crime news about the gangarape on the two ladies in bihar news
धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवून मुलींवर केला सामूहिक बलात्कार  |  फोटो सौजन्य: ANI

बिहार : सुपौल जिल्ह्यातील हुसैनाबाद गावात दोन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली आपल्या संपूर्ण कुटुंबासह दसऱ्याच्या निमित्ताने यात्रेला गेल्या होत्या. रस्त्यावर लोकांची वर्दळ नव्हती. याच संधीचा फायदा घेऊन या नराधमांनी दोघींवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना मंगळवारी घडली आणि पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली दसऱ्यानिमित्त कुटुंबासह यात्रेला गेल्या होत्या. निर्मनुष्य रस्त्यावरून जाताना त्यांना जवळपास ५ ते ६ जणांनी अडवले. रस्त्यावर लोकांची वर्दळ नसल्यामुळे या नराधमांनी मिळून या दोन्ही बहिणींचा सामूहिक बलात्कार केला. यापैकी एका मुलीने विरोध केला होता. मात्र, आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून त्या मुलीला गोळी मारली. त्यानंतर तिला हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले असता, तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.  या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली असता, आरोपींचा शोध सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी