मुंबईतील काकाने अल्पवयीन मुलीला विकले अजमेरमध्ये 

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 13, 2019 | 17:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

 चुरू जिल्ह्यातील रतनगड पोलिसांनी महाराष्ट्रातील एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. तिच्या काकाने तिला अजमेरमध्ये विकले होते. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. आता तिची रवानगी बालिका

प्रातिनिधिक फोटो 

थोडं पण कामाचं

  • सख्या काकांनी विकले पुतणीला
  • मुंबईतील अल्पवयीन तरूणीला विकले अजमेरला
  • ५० वर्षीय व्यक्तीला विकले १६ वर्षीय मुलीला
  • ५० वर्षीय व्यक्तीने अनेक वेळा अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
  • अमेजरमधून सुटका करून मुलगी पळाली रतनगडला

जयपूर : नातेसंबंधाना काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या रतनगड येथे उघडकीस आली.  मुंबईतील एका काकाने आपल्या पुतणीला तिच्या पेक्षा तिप्पट वय असलेल्या व्यक्तील विकण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या मुलीला विकल्यानंतर त्या मुलीवर अनेकवेळा त्या वयस्क व्यक्तीने बलात्कार केले.  चुरू जिल्ह्यातील रतनगड पोलिसांनी महाराष्ट्रातील एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. तिच्या काकाने तिला अजमेरमध्ये विकले होते. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. आता तिची रवानगी बालिका आश्रमात केली आहे. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की, या अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर १६ वर्षांची ही मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसोबत मुंबईच्या भेंडीबाजार भागात लोकांच्या घरी कामे करून आपला उदरनिर्वाह करत होती. काही दिवसांपूर्वी तिची मोठी बहिण एका रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडली. त्यानंतर ती आपल्या काकाच्या घरी राहत होती. काकाने सुट्टीनिमित्त फिरायला घेऊन जातो म्हणून तिला अजमेरला आणले. 

गेल्या चार ऑगस्ट रोजी एका ५० वर्षीय व्यक्तीला तिला विकले. खरेदी करणाऱ्या व्यक्तीने तिला बंधक बनवले. तसेच तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पीडित मुलगी कशीतरी बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या तावडीतून सुटून आली. तिने अजमेरमधून बस पकडून चुरू जिल्ह्यातील रतनगड पर्यंत पोहचली. पोलिसांना ही मुलगी बेवारस अवस्थेत एका मंदिरात सापडली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुरूमधील रतनगड येथील काही लोकांनी या अल्पवयीन मुलीला विचित्र अवस्थेत पाहिले. याची सूचना त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहचलो. त्या मुलीला आम्ही बाल कल्याण समितीमार्फत बालआश्रमात पाठविले. या प्रकरणाची चौकशी राजस्थान पोलीस करत असून आरोपी काकाचा शोध सुरू आहे. या संदर्भात मुंबईतही पथक पाठविण्यात येईल, तसेच मुंबई पोलिसांचीही या प्रकरणी मदत घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या मृत्यूनंतर मी काकासोबत राहत होती. त्यांनी एकदा मला फिरायला जायचं म्हणून सांगितले. मला खूप आनंद झाला. मी तयारी केली. त्यानंतर आम्ही मुंबईतून अजमेरला आलो. पण त्या ठिकाणी काकापेक्षा वयाच्या माणसाकडे मला काकांनी सोपवले. त्या माणसाने मला खूप त्रास दिला. मी कशीबशी त्या व्यक्तीला न कळू देता तिथून पळ काढला. एका बसमध्ये बसली आणि या गावात आली. मला खायला काही नव्हते. म्हणून मी मंदिराजवळ आल्याचे या मुलीने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी