सेक्स रॅकेट प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या साक्षीनंतर हा आमदार अडचणीत, चौकशी सुरू 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 20, 2019 | 18:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

 पाटणाशी संबंधीत बहुचर्चित सेक्स रॅकेटमधील आरोपी आमदार अरुण कुमार यादव आतापर्यंत पोलिसांपासून वाचत फिरत आहेत.

crime news sex racket minor girl named MLA police search news in marathi
सेक्स रॅकेट प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या साक्षीनंतर हा आमदार अडचणीत 

थोडं पण कामाचं

  • सेक्स रॅकेट प्रकरणी आमदार अडचणीत
  • अल्पवयीन मुलीने घेतले आमदाराचे नाव
  • आमदाराला पकडण्यासाठी पोलिसांनी रचला सापळा

आरा :  पाटणाशी संबंधीत बहुचर्चित सेक्स रॅकेटमधील आरोपी आमदार अरुण कुमार यादव आतापर्यंत पोलिसांपासून वाचत फिरत आहेत. बुधवारी रात्री उशीरा पाटणा येथील आमदारांच्या हार्डिंग रोड येथील सरकारी घराची तपासणी केल्यानंतर भोजपूर पोलिसांनी बख्तियारपूर येथे धाडी टाकल्या. 

दरम्यान, पोलिसांनी आमदारांच्या जवळच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आणि सुमारे दोन तास चौकशी केली. नंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. 

या सेक्स रॅकेटमध्ये एका अल्पवयीन मुलीने आमदाराचे नाव घेतल्याने आमदार यादव यांची अडचणी वाढल्या आहे. पोलीस अजूनही फरारी आमदाराचा शोध घेत आहेत. तसेच त्याच्या संबंधीत ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. तसेच आमदारच्या नातेवाईकांना पोलिसांनी आपल्या रडारवर ठेवले आहेत. तसेच त्याच्या जवळच्या आणिं संबंधित माणसांवरही पोलिसांची नजर आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदाराविरूद्ध फास आवळला आहे.

न्यायालयाने आमदाराला यापूर्वीच फरार घोषित केले आहे. अशात कोर्टात तो आत्मसमर्पण करू शकतो.  यामुळे पोलिसांनी  कोर्ट परिसराबाहेर आपला बंदोबस्त वाढवला आहे. तसेच पाटणा परिसरात नाकाबंदी सुरू केली आहे. यात आमदार आढल्यास त्याला अटक करून नंतर कोर्टासमोर सादर करण्याची पोलिसांची योजना आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी