Crime News: रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीचा नग्नावस्थेत आढळला मृतदेह, बलात्कार झाल्याचा संशय

25 Year Woman Naked Body Found In House : बिहारमधील (Bihar) औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) औबरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका गावात एका 25 वर्षीय महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह (Naked body) आढळून आला आहे.

The body of a railway employee's wife was found naked
रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीचा नग्नावस्थेत आढळला मृतदेह  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ग्रामस्थांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली
  • मृतक महिला घरात एकटीच राहत होती.
  • दोन वर्षांपूर्वीच मृतक महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरी लागली होती

25 Year Woman Naked Body Found In House : बिहार : बिहारमधील (Bihar) औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) औबरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका गावात एका 25 वर्षीय महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह (Naked body) आढळून आला आहे. मृतक महिलेचा पती रेल्वे कर्मचारी (Railway staff) असून तो चालक पदावर कार्यरत आहे. मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आपला तपास सुरू केला आहे. या महिलेवर बलात्कार झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे.स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सकाळी ही महिला आपल्या घरातून बाहेर पडली नाही आणि दरवाजाही बंद होता. त्यानंतर घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न शेजाऱ्यांनी केला. मात्र, दरवाजा आतून बंद होता. यानंतर शेजाऱ्यांनी त्या महिलेला कॉल केला मात्र, फोनही स्विच ऑफ होता.

अखेर शेजाऱ्यांपैकी काहीजण छतावर चढून पाहू लागले तेव्हा महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. महिलेच्या गळ्यावर काळे व्रण होते. यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती मृतक महिलेच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृतक महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी आरोप केला आहे की, तिला घरात एकटीला पाहून कुणीतरी गैरफायदा घेत बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. यासोबतच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर येत नाहीत तोपर्यंत मृतदेहाला हात लावून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा सुद्धा ग्रामस्थांनी घेतला होता.

घटनास्थळी दाखल झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, या प्रकरणातील आरोपींना लवकरच पकडून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करुन शिक्षा करण्यात येईल. महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली की नाही हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वीच मृतक महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरी लागली होती आणि नोकरीसाठी तो बाहेरगावी असायचा. मृतक महिला घरात एकटीच राहत होती. सोमवारी सायंकाळी ती बाजारातही गेली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी