किळसपणाचा कळस! वीर्य आणि मूत्राचे केक खाऊ घातले शिक्षिकेला, असा झाला उघड प्रकार 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 20, 2019 | 22:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिक्षकेची खोडी काढतांना विद्यार्थ्यांनी किळसपणाचा कळस गाठला, दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वीर्य आणि मूत्राने भरलेला केक खाऊ घातल्याला अत्यंत घाणेरडा प्रकार समोर आला आहे.

crime news usa student prepare cake of urine and Semen lady teacher test this cake news in marathi
धक्कादायक! वीर्य आणि मूत्राचे केक खाऊ घातले शिक्षिकेला  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वीर्य आणि मूत्राने भरलेला केक खाऊ घातल्याला अत्यंत घाणेरडा प्रकार समोर आला आहे.
  •  त्यानंतर या विद्यार्थ्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
  • १०० तासांची श्रमदानाची शिक्षा देण्यात आली आहे. 

ओहोयो : शिक्षकेची खोडी काढतांना विद्यार्थ्यांनी किळसपणाचा कळस गाठला, दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वीर्य आणि मूत्राने भरलेला केक खाऊ घातल्याला अत्यंत घाणेरडा प्रकार समोर आला आहे.  त्यानंतर या विद्यार्थ्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. १०० तासांची श्रमदानाची शिक्षा देण्यात आली आहे. 

अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील ओलेन्टँजी माध्यमिक शाळेचे हे विद्यार्थी आहेत. शाळेत कुकरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परिक्षण शालेच्या शिक्षिका करणार होत्या. विद्यार्थ्यांनी केक बनवला आणि त्यावर वीर्याने आयसिंग केले होते. तर दुसऱ्या एका विद्यार्थाने आपल्या केकमध्ये मूत्र मिक्स केले होते. ही स्पर्धा झाल्यावर शिक्षिकेने केकची टेस्ट घेतली शिक्षिकेला काही तरी गडबड असल्याचे लक्षात आले नाही. पण काही काळानंतर या घटनेचा खुलासा झाला. 

हे मुलं आपली डिश तयार करत होते. तेव्हा काही मुलांनी त्याचं चित्रिकरण केले होते. चित्रीकरणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या दोन्ही विद्यार्थ्यांची ही किळसवाणी खोडी समोर आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हा त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपण ही खोडी केली असल्याचे मान्य केले. 

यूट्यूबमधील एका व्हिडिओमुळे केकमध्ये वीर्य मिसळण्याची कल्पना सूचल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.  न्यायालयाने या विद्यार्थ्यांना एक महिना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहेत. तसेच त्यांना १०० तास श्रमदान करण्याची शिक्षा ठोठावली आहे. 

दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेतून रेस्टिकेट करण्यात आले आहे. घटनेनंतर शिक्षिकेला मानसिक धक्का बसला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी