धक्कादायक: तहान लागलेल्या कामगाराला महिलेनं पाण्याऐवजी पाजलं अॅसिड

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2019 | 17:40 IST | टाइम्स नाऊ हिंदी

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. या ठिकाणी एका कामगाराला महिलने पाण्याऐवजी चक्क अॅसिड पाजलं. अॅसिड पिल्यानंतर कामगाराला रक्ताच्या उलट्या झाल्या.

crime
गुन्हा  |  फोटो सौजन्य: Representative Image

नोएडा: उत्तरप्रदेशच्या नोएडा इथं घडलेल्या एका धक्कादायक प्रकारानं संपूर्ण परिसर हादरला आहे. येथील छलेरा गावामध्ये शटरिंगचं काम करायला आलेल्या कामगाराला एका महिलेनं अॅसिड पाजल्याची माहिली पोलिसांनी दिलीय. पोलीस स्टेशन सेक्टर ३९ चे प्रभारी निरीक्षक प्रशांत कपिल यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये राहणारा गुरनाम सिंह, अर्जुन आणि सुंदर छलेरा गावामध्ये एका घरी शटरिंगचं काम करायला आले होते.

पोलिसांनी सांगितलं की, ज्या घरात हे लोक शटरिंगचं काम करत होते, तिथं शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं पाण्याच्या बॉटलमध्ये अॅसिड भरून आणलं. यानंतर त्या महिलेने काम करणाऱ्या एका मिस्त्रीला तुम्हाला तहान लागली असेल तर घ्या हे पाणी प्या असं सांगितलं. तेव्हा शटरिंगचं काम करत असलेला गुरनाम सिंह याने पाणी समजून अॅसिड पिलं. थोड्यावेळानंतर त्याला रक्ताची उलटी व्हायला लागल्या. त्याची प्रकृती आणखीनच ढासळली. अशा नाजूक स्थितीमध्ये त्याला मग नोएडाच्या कैलाश हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं.

याप्रकरणी आता पीडित कामगार गुरनाम सिंहचा मुलगा रंजीतनं मंजू नावाच्या त्या महिलेच्या विरोधात सेक्टर ३९च्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. घटनेची तक्रार नोंदवून घेताच पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. या महिलेनं असं का केलं. तिनं मुद्दाम पाणी म्हणून कामगाराला अॅसिड  प्यायला दिलं की, तिच्या नजरचुकीनं तसं घडलं याबाबत अजून काही माहिती समोर आलेली नाहीये. पोलिसांच्या संपूर्ण तपासानंतरच नेमकं असं का घडलं याची माहिती मिळेल.

पण अशा घटना म्हणजे देशात वाढत चाललेल्या गुन्हेगारीचे उदाहरणच म्हणता येईल. देशभरात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. बलात्कार आणि हत्या तर दिवसात किती होतात हे सांगणं कठीण होऊन बसलंय. माणसाची विचार करण्याची पद्धत बदलत चालली असल्याचं अशा गुन्ह्यांच्या घटनांवरून दिसून येतं.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली होती. बरेली इथं एका महिलेनं दोन वर्ष संसार केल्यानंतर, एका मुलीला जन्म दिल्यानंतर आपल्या पतीला पेटवून दिलं. त्यामागचं कारण अतिशय धक्कादायक होतं. पती काळा असल्यामुळं तिने त्याला थेट पेटवून दिल्याचं सांगितलं गेलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
धक्कादायक: तहान लागलेल्या कामगाराला महिलेनं पाण्याऐवजी पाजलं अॅसिड Description: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. या ठिकाणी एका कामगाराला महिलने पाण्याऐवजी चक्क अॅसिड पाजलं. अॅसिड पिल्यानंतर कामगाराला रक्ताच्या उलट्या झाल्या.
Loading...
Loading...
Loading...