Crime | जिजाजी आणि सालीने घातला धुमाकूळ, माहेरी गेलेल्या बायकोला बसला धक्का, केला खून

Murder | पत्नीला भेटायला सासरी जाणारा पती तिथे आपल्या सालीकडे आकर्षित झाला. दोघांचे प्रकरण सुरू झाले. सालीलादेखील आपला जिजाजी आवडला होता. पतीने मग सालीच्या साहाय्याने पत्नीला आपल्या मार्गातून दूर केले. त्या महिलेने आपल्या पतीसहीत आपल्या बहीणीलादेखील खूप समजावयाचा प्रयत्न केला. मात्र तेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले. जिजाजी आणि सालीच्या अनैतिक संबंधांमध्ये त्या महिलेचा अडथळा येत असल्याने त्या दोघांनी मिळून महिलेला मार्गातून दूर करण्याचा डाव आखला.

Murder of woman
अनैंतिक संबंधातून विवाहितेचा खून  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भावंडांचा सांभाळ करण्यासाठी विवाहीत महिला माहेरीच राहत होती
  • पत्नीला भेटायला पती वारंवार माहेरी जात होता, सालीशी सुरू झाले अनैंतिक संबंध
  • विवाहितेला मार्गातून दूर सारण्यासाठी जिजाजी आणि सालीने केला खून

Murder of Married Woman | पाटणा : एका महिलेला (Woman) सासरऐवजी माहेरी मुक्काम ठोकणे चांगलेच महागात पडले. ही महिला आपल्या माहेरीच राहत होती. तिला भेटण्यासाठी तिचा पती नेहमी तिच्या माहेरी येत होता. मात्र पतीचे (Husband) तिला वारंवार भेटायला येणे तिच्या जीवावरच बेतले. पत्नीला भेटायला सासरी जाणारा पती तिथे आपल्या सालीकडे (Sister in law)आकर्षित झाला. दोघांचे प्रकरण (Love affair)सुरू झाले. सालीलादेखील आपला जिजाजी आवडला होता. पतीने मग सालीच्या साहाय्याने पत्नीला आपल्या मार्गातून दूर (Murder of wife) केले. हे प्रकरण घडले आहे पाटण्यातील मोकामा पोलिस स्टेशन परिसरात. दोन मुलांची आई असलेल्या २४ वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना (Patna Police) तिच्या माहेरीच एका पेटीमध्ये आढळला आहे. जवळपासच्या लोकांचे म्हणणे आहे की हा खून तिची सख्खी बहीण आणि पती या दोघांनी मिळूनच केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Teen Girl fall in love with sister's husband & get involved in sister's murder)

महिला भावंडांसाठी राहत होती माहेरी

समोर आलेल्या माहितीनुसार ज्या महिलेचा खून झाला आहे तिला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये तिला होती. ती आपल्या दोन बहीणी आणि भावाबरोबर आपल्या माहेरी राहत होती. त्या महिलेचे आई-वडील खूप दिवसांपासून घर सोडून कुठेतरी निघून गेले होते. त्यामुळे आपल्या भावंडांचा सांभाळ करण्यासाठी ती महिला माहेरी राहत होती. त्या महिलेच्या पतीचे घरदेखील या गल्लीमध्ये आहे. महिलेचे सासरे सरकारी कर्मचारी आहेत. त्या गल्लीतील लोकांचे म्हणणे आहे की महिला आणि तिच्या मुलांचा खर्च तिचे सासरेच करायचे. त्या महिलेचे सासरे तिला नेहमी सांगायचे की तू सासरीच राहा. मात्र आपल्या बहीणी आणि भावासाठी ती महिला माहेरीच राहत होती.

जिजाजीचे सालीशी संबंध

त्या महिलेच्या माहेरी राहण्यामुळे तिचा पतीदेखील वारंवार तिच्या माहेरी येत जात असे. तिचा पती काही दिवसांआधीपर्यत बंधन बॅंकेत काम करत होता. अलीकडेच तो बेगूसराय परिसरात टॅक्सी चालवत होता. पतीच्या आपल्या सासरी वारंवार जाण्याने त्याचे आपल्या सालीशी विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा संपूर्ण गल्लीत सुरू झाली होती. हळूहळू ही चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली तशी ती विवाहीत महिला अस्वस्थ होऊ लागली.

गल्लीत सुरू झाली अनैतिक संबंधांची चर्चा

गल्लीतील लोकांचे म्हणणे आहे की त्या महिलेने आपल्या पतीसहीत आपल्या बहीणीलादेखील खूप समजावयाचा प्रयत्न केला. मात्र तेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले. जिजाजी आणि सालीच्या अनैतिक संबंधांमध्ये त्या महिलेचा अडथळा येत असल्याने त्या दोघांनी मिळून महिलेला मार्गातून दूर करण्याचा डाव आखला. महिला अचानक गायब झाल्याने तिच्या माहेरी आणि सासरी एकदम गोंधळ माजला. तिच्या एका नातेवाईकाने मोकामा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदेखील केली. पोलिस इन्स्पेस्कटरने तिच्या माहेरी जाऊन तिच्या मृतदेहाची तपासणी केली. त्यानंतर त्या खोलीला सील करण्यात आले. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला असून ते फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी