Crime: कर्ज फेडण्यासाठी पतीने काढला पत्नीचा काटा, अशी केली हत्या..

Murder for Insurance: एका व्यक्तीने कर्ज फेडण्यासाठी आपल्या पत्नीचीच हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे.

crime to repay debt husband first got wife insured then killed internet help
कर्ज फेडण्यासाठी पतीने काढला पत्नीचा काटा, अशी केली हत्या..  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कर्ज फेडण्यासाठी पतीने केली पत्नीची हत्या
  • हत्येपूर्वी पतीने उतरवला होता पत्नीचा विमा
  • पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक

Insurance: भोपाळ: विम्याच्या रकमेतून कर्ज फेडण्यासाठी मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची गोळ्या घालून हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची (Wife) हत्या करण्याआधी पतीने (Husband) इंटरनेटवर व्हीडिओ पाहिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. बद्रीप्रसाद मीणा नावाच्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने कर्ज फेडण्याचा (repay debt) मार्ग शोधण्यासाठी इंटरनेटवर अनेक व्हिडिओ पाहिले होते त्यानंतरच त्याने हे भीषण पाऊल उचललं. (crime to repay debt husband first got wife insured then killed internet help)

विम्याचे कर्ज फेडण्यासाठी पतीने केली पत्नीची हत्या 

काही व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीने आधी पत्नीचा विमा काढला आणि नंतर विम्याच्या पैशासाठी तिची हत्या केली. पूजा असे मृत महिलेचे नाव असून तिच्या पतीने 26 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास भोपाळ रोडवरील माना जोडजवळ तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अधिक वाचा: मर्डरनंतर बिर्याणी पार्टी..., अमरावती प्रकरणात NIA चे अनेक धक्कादायक खुलासे

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी पतीने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रकरणाचा बारकाईने तपास केला असता पतीच आरोपी असल्याची पोलिसांची खात्री झाली आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरु केला. अखेर आरोपी पतीने आपला गुन्हा कबूल केला. 

पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीच्या हत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. मात्र, हत्येवेळी चौघेजण घटनास्थळी नव्हते असे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे पोलिसांचा पतीवरचा संशय अधिक बळकट झाला. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी बद्रीप्रसाद मीणा याने संपूर्ण गुन्हा कसा केला हे पोलिसांनी सांगितलं. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

अधिक वाचा: Shocking Video: आईने पोटच्या मुलाला फेकले पाचव्या मजल्यावरून, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

पोलिसांनी आरोपी पतीला केली अटक 

पोलिसांनी बद्रीप्रसाद मीणासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. तर त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास अद्यापही सुरुच आहे. 

अधिक वाचा: प्राध्यापक पतीचा वनरक्षक पत्नीने केली हत्या, गोंदलेल्या नावावरून लागला हत्येचा छडा

दरम्यान, या प्रकरणाने महिलेच्या माहेरकडील नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून आरोपी पतीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी