Crime Story : पती काळा आहे म्हणून त्याला पेटवले

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2019 | 17:22 IST | Times Now, TNN Reports

Wife Killed Husband: पती काळा आहे म्हणून पत्नीने त्याला जाळून मारल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. दोन वर्षे संसार केल्यानंतर, एका मुलीला जन्म दिल्यानंतर त्या महिलेनं हे कृत्य केले आहे.

woman sets her husband on fire because of his dark complexion
काळा असलेल्या पतीला तिने पेटवले   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पती-पत्नीच्या वादातून उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना
  • काळा आहे म्हणून, पत्नीनेच त्याला पेटवून दिले
  • पत्नी विरोधात पोलिसांत गुन्ग

बरेली (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमध्ये एक अतिशय धक्कादायक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आपल्या पतीला पेटवून दिले आहे. त्यामागचे कारण अतिशय धक्कादायक आहे. पती काळा असल्यामुळे तिने त्याला थेट पेटवून दिल्याचे सांगितले जात आहे. प्रेमश्री असं त्या महिलचं नाव असून ती २२ वर्षांची आहे. तर तिच्या पतीचे नाव सत्यवीर सिंह आहे. विशेष म्हणजे तो तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार प्रेमश्री आणि सत्यवीर दोघांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक पाच महिन्यांची मुलगी देखील आहे. सोमवारी पती पहाटे गाढ झोपेत असताना प्रेमश्रीने पावणे सहाच्या सुमारास त्याला पेटवून दिले. पतीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आरोपी प्रेमश्रीने जेव्हा पतीला पेटवून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या पायालाही थोडे भाजले आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक सहदेव सिंह यांनी याप्रकरणी कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, पती सत्यवीर याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे प्रेमश्रीवर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बरेलीमधील ही घटना दुदैवी असल्याचे मत व्यक्त होत आहे. पतीसोबत दोन वर्षे संसार केल्यानंतर, एका मुलीला जन्म दिल्यानंतर पत्नीने काळा आहे म्हणून पतीला पेटवून दिले. यात त्या चिमुकल्या मुलीचा काय दोष, अशी भावना गावातील महिला व्यक्त करत होत्या. आईच्या अविचारी कृत्यामुळे ती चिमुकली बापाच्या मायेपासून मुकल्याची भावना गावात व्यक्त होत होती.

पोलिसांकडून कसून चौकशी

या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला आहे. यात सत्यवीरचा भाऊ हरवीरची चौकशी करण्यात आली. प्रेमश्री सातत्याने सत्यवीरला त्याच्या वर्णावरून टोमणे मारायची, असे त्याने सांगितले. तो धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. पत्नीच्या टोमण्यांचा संदर्भ घेऊन पोलिस तपास करत होते. त्यानंतरच चौकशीत प्रेमश्रीनेच पतीला पेटवून दिल्याचे उघड झाले. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. संबंधिताने आपल्या पत्नीच्या गुप्तांगांवर लोखंडाने वार केले होते. पत्नी तिच्या मित्रासोबत फोनवर बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Crime Story : पती काळा आहे म्हणून त्याला पेटवले Description: Wife Killed Husband: पती काळा आहे म्हणून पत्नीने त्याला जाळून मारल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. दोन वर्षे संसार केल्यानंतर, एका मुलीला जन्म दिल्यानंतर त्या महिलेनं हे कृत्य केले आहे.
Loading...
Loading...
Loading...