तरुणीवर हेड कॉन्स्टेबल चुलत्याने दोन वर्ष केला बलात्कार, नदीत आत्महत्येचा प्रयत्न

तरुणीच्या काकाने तिला एका हॉटेलमध्ये नेले होते, तिथे त्याने तिला कोल्ड्रिंगमधून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर ती तरुणीला गुंगी आली असताना तिच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला.

Young woman raped by uncle
चुलत्याकडून तरुणीवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • २५ वर्षीय तरुणीवर कॉन्स्टेबल काकाकडूनच बलात्कार
  • दोन वर्षे ब्लॅकमेल करत बलात्कार
  • तरुणीने नदीत उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली: एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या काकानेच दोन वर्षे अनेकवेळा बलात्कार (Rape)केल्यानंतर या तरुणीने नदीमध्ये उडी घेत आत्महत्येचा (Suicide attempt by victim) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने जीव देण्यासाठी गंगा नदीत उडी घेतली असता पोलिस कर्मचारी आणि इतर नागरिकांनी तिला वाचवले आहे. महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. (Crime: Young woman, raped by cop uncle for 2 years, attempts suicide by jumping into River)

व्हिडिओ बनवून केले ब्लॅकमेल

तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार तिच्या काकाने तिच्या कुटुंबियांना जानेवारी २०१९ मध्ये प्रयागराज येथे कुंभासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर ही तरुणी तिचे कुटुंबिय प्रयागराज येथे गेले होते. त्यांच्या मुक्कामाच्या काळात तरुणीच्या काकाने तिला एका हॉटेलमध्ये नेले होते, तिथे त्याने तिला कोल्ड्रिंगमधून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर ती तरुणीला गुंगी आली असताना तिच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओआधारे त्याने तरुणीला ब्लॅकमेल केले. त्यानंतर या हेड कॉन्स्टेबलने मागील दोन वर्षात त्या तरुणीवर प्रयागराज आणि कानपूर येथे अनेकवेळा बलात्कार केला. 

गर्भवती असल्याचे कळल्यावर केली मारहाण

या सर्व प्रकारानंतर ती तरुणी गर्भवती असल्याचे कळल्यावर त्या हेड कॉन्स्टेबलने तिला गर्भप्रतिरोधक गोळ्या दिल्या. दोन दिवसांपूर्वी हेड कॉन्स्टेबल आणि त्याचा मुलगा हे त्या मुलीला कानपूर येथेली चकेरी परिसरातील एका घरात घेऊन गेले आणि तिथे त्यांनी तिचा आणखी एक व्हिडिओ बनवला. त्यांनी तिला पुन्हा ब्लॅकमेल केले.  तिला मारहाण करत त्यांनी धमकावले. त्यांच्या तावडीतून पलायन केल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन केला, माहिती सांगितली आणि त्यानंतर आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र तोपर्यत पोलिस कर्मचारी तिथे पोचल्याने त्यांनी आणि इतर नागरिकांनी तिचा जीव वाचवला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

भारतीय दंडविधानाअंतर्गत विविध कलमाअंतर्गत आरोपी हेड कॉन्स्टेबल आणि त्याच्या मुलावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र ते त्या दोघांना अद्याप अटक व्हायची आहे. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवल्यानंतर कॉन्स्टेबलला निलंबित केले जाणार आहे. आरोप निश्चित करण्यासाठी पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणीदेखील केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील साकीनाका परिसरात एका महिलेवर झालेल्या रेप प्रकरणामुळे महाराष्ट्रसह देश हादरून गेला आहे. त्यातच पुण्यात  २ अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच दुसरीकडे पिंपरी-चिंचवड देखील एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुंड आणि त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी