Money Fraud : शेअर बाजारातून पैसे दुप्पट करण्याचं अमिष, पुजाऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, असा उघड झाला गुन्हा

कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याच्या अमिषाला एक पुजारी भुलले आणि कोट्यवधींची संपत्ती आरोपीकडे दिली. ती घेऊन आरोपी फरार झाल्यावर त्यांचे डोळे उघडले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Money Fraud
शेअर बाजारातून पैसे दुप्पट करण्याचं अमिष  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं अमिष
  • पुजाऱ्याकडून घेतले कोट्यवधी रुपये
  • पैशांच्या लोभापायी झाली फसवणूक

Money Fraud | आपल्याकडे असणारे पैसे वाढावेत आणि कुठेतरी गुंतवणूक करून वेगाने आर्थिक लाभ व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र त्यासाठी कायदेशीर गुंतवणुकीचे पर्याय सोडून काहीजण इतर मार्गांचा अवलंब करताना दिसतात. त्यातील काहींना त्यात यशही येतं. मात्र मुळातच बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्यामुळे कुठलीही कायदेशीर सुऱक्षा आपल्या संपत्तीला मिळत नाही. त्यामुळे अखेर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. अशीच वेळ एका पुजाऱ्यावर आणि त्याच्या कुटुबीयांवर आली आहे. आपल्याकडे असणारी कोट्यवधी रुपयांची संपत्ती या पुजारी कुटुंबीयांनी आरोपीला दिली आणि दामदुप्पट होऊन ही रक्कम आपल्याकडे परत येईल, याची वाट पाहत बसले.

अशी घडली घटना

राजस्थानच्या खाटुश्याम मंदिराचे पुजारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेटायला काही आठवड्यांपासून संशयित आरोपी आले होते. त्यांच्याकडे असणारे पैसे केवळ बँकेत ठेवण्याऐवजी ते जर आपल्याला दिले, तर आपण दामदुप्पट करू शकतो, असं आश्वासन त्यानं पुजाऱ्यांना दिलं. शेअर बाजारातील काही नामांकित कंपन्यांमध्ये हा पैसा गुंतवला जाईल आणि त्यानंतर लवकरच त्याचं मूल्य वाढल्यावर शेअर्स विकून दुप्पट पैसे परत दिले जातील, असं आश्वासन त्याने पुजाऱ्यांना दिलं. पैसे दुप्पट होण्याच्या कल्पनेनं भारावलेल्या पुजारी आणि कुटुंबीयांनी तब्बल 3 कोटी 32 लाख रुपये त्या इसमाला देण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा -  बाबो... कर्नाटकहून दिल्लीला जाणारी ट्रेन हायजॅक, आणि ट्विटरवर रेल्वे प्रशासनाची मदत घेत...

इसम झाला गायब

पैसे घेतल्यानंतर आरोपी काही दिवस संपर्कात होता. मात्र नंतर तो पुजारी आणि कुटुंबीयांचे फोन टाळू लागला. शिवाय 3.32 कोटी रुपये घेतल्याची कुठलीही पावती किंवा कागदपत्रंही पुजाऱ्यांना देण्यात आली नव्हती. बरेच दिवस होऊनही काहीच थांगपत्ता लागत नसल्यामुळे आणि आरोपी फोनवर दाद देत नसल्यामुळे अखेर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा -  IRCTC : आता काही क्षणांत समजू शकेल रेल्वे तिकीटाच्या रिफंडचं स्टेटस, वापरा ही सोपी पद्धत

पोलीस तपास सुरू

आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकऱणाची तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकऱणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. पुजाऱ्यांकडून घेण्यात आलेले पैसे हे विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचं आरोपीनं कुटुंबीयांना ईमेलवरून कळवलं होतं. मात्र त्याबाबत कुठलीही कागदपत्रं देण्यात न आल्यामुळे कुुटुुंबीयांना संशय आला होता. वास्तविक, आरोपीनं पुजाऱ्यांकडून घेतलेले पैसे शेअर बाजारात गुंतवलेच नसल्याचं तपासात दिसून आलं आहे. हे पैसे नेमके कुठे गेले आणि त्याचं काय झालं, याबाबत पोलीस तपास करत आहेत. लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येईल आणि पुजारी कुटुंबीयांचे पैसे त्यांना परत मिळवून देण्यात येतील, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. पैशांच्या लोभापायी कायदेशीर संरक्षण नसलेल्या ठिकाणी पैसे गुंतवल्यावर काय होऊ शकतं, याचा धडाच या प्रकऱणातून मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी