Crime : काही नराधमांनी केवळ 11 वर्षाच्या मुलीला (11 year old minor girl) तिच्या घरातून खेचत बाहेर आणून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपींनी (Suspects) तिच्या भांगेत कुंकू भरण्याचाही प्रयत्न केला. दिल्लीजवळच्या नोएडामध्ये (Noida) ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार तपास सुरू (Police investigation) करण्यात आला.
दिल्लीच्या सीमेवर असणारा नोएडा हा परिसर नव्याने विकसित झालेला आहे. इथली लोकवस्ती गेल्या काही वर्षात वाढत चालली असून तिथली गुंडगिरीदेखील वाढत चालल्याचं चित्र आहे. या भागात अनेक दादा आणि भाई नव्याने तयार होत असून सर्वसामान्यांना त्याचा भलताच त्रास होत असल्याचे अनुभव गेल्या काही वर्षात येत आहेत. काहीही संबंध नसताना नजर पडेल त्या मुलीची छेड काढणे, तिच्याशी गैरव्यवहार करणे, तिच्या कुुटुंबीयांना धमकावणे असे प्रकार वाढत चालल्याची तक्रार या परिसरातील नागरिक करत असतात. याच भागात राहणाऱ्या एका 11 वर्षांच्या मुलीसोबतही अशीच घटना घडली.
आपल्या घरात खेळत असलेल्या या मुलीची याच परिसरातील चौघांनी छेड काढली. मुलीने त्याला विरोध केल्यानंतर संतापलेल्या चौघांनी तिला धडा शिकवण्याचे ठरवले. या चौघांनी मग मुलीला जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणले आणि आम्ही काय करू शकतो, हे दाखवण्याची धमकी दिली. हा प्रकार पाहून आजूबाजूचे नागरिक आणि रस्त्याने जाणारी गर्दीही तिथे जमली. गर्दी पाहून या तरुणांचा अधिकच चेव आला आणि त्यांनी आपलं उपद्रव्यमूल्य दाखवण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा - ४५ वर्षीय करोडपती महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्ती ठेवले शारीरिक संबंध आणि मग घडलं असं की...
या मुलांनी सर्वांदेखत या मुलीसोबत काही अश्लील हालचाली केल्या आणि तिच्या भांगेत कुंकू भरलं. कुणाचीही पर्वा न करता तरुणांनी केलेल्या या कृत्याला विरोध करण्यासाठी कुणीही पुढं आलं नाही. त्यामुळे या तरुणांचं धाडस अधिकच वाढलं आणि त्यांनी दादागिरीची भाषा करत आणि धमकी देत तिथून काढता पाय घेतला. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
अधिक वाचा - Monkeypox पासून बचाव करायचाय मग फिजिकल रिलेशन दरम्यान चुकूनही करू नका ही चूक, WHO ने दिला सल्ला
हा प्रकार घडल्यानंतर मुलीच्या आईने नोएडाच्या सेक्टर 20 पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुुरुवात केली आहे. सध्या हे चौघेही आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. आरोपींपैकी रोहित आणि शैलेंद्र अशी दोघांची नावं असून इतर दोघांच्या नावांचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पोलीस तपासत असून त्यावरून या चौघांचा शोध घेतला जात आहे. लवकरच चौघांनाही अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. या घटनेमुळे नोएडा परिसरात भितीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.