Pakistan Crisis: पाकिस्तानमध्ये आता विद्यार्थ्यांवर संकट! ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सेशनला पुस्तके मिळणार नाहीत

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 24, 2022 | 15:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Now Pakistan Facing Paper Crisis । पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परकीय चलन, पेट्रोल-डिझेल आणि वीज संकटानंतर आता देशात कागदी संकटही निर्माण झाले आहे.

Crisis on students in Pakistan now, Books will not be available for the session starting August
पाकिस्तानात आता कागदी संकट, पुस्तकांचा भासतोय मोठा तुटवडा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
  • पाकिस्तानात आता कागदी संकट, पुस्तकांचा भासतोय मोठा तुटवडा.
  • ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सेशनला पुस्तके मिळणार नाहीत.

Now Pakistan Facing Paper Crisis । नवी दिल्ली : पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परकीय चलन, पेट्रोल-डिझेल आणि वीज संकटानंतर आता देशात कागदी संकटही निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील लाखो विद्यार्थ्यांकडे ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके नसणार आहेत. पेपर इंडस्ट्री असोसिएशनने कागदाचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. (Crisis on students in Pakistan now, Books will not be available for the session starting August). 

अधिक वाचा : इयत्ता दुसरीतील मुलाने १८ मिनिटात पोहून पार केली यमुना नदी

अनेक असोसिएशनांनी सरकारला दिला इशारा

दरम्यान, सध्याचे संकट स्थानिक पातळीवर उत्पादित कागदाच्या वाढत्या किमतींमुळे उद्भवले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, असोसिएशनने कागदाच्या देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सरकारला दोष दिला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये देशातील प्रमुख अर्थतज्ञ डॉ. कैसर बंगाली यांच्यासह ऑल पाकिस्तान पेपर मर्चंट असोसिएशन,  पाकिस्तान असोसिएशन ऑफ प्रिंटिंग ग्राफिक आर्ट इंडस्ट्री आणि  पेपर उद्योगाशी निगडित इतर संस्थांनी इशारा दिला आहे की, जर पुस्तक असलेल्या पेपरची किंमत स्थिर न ठेवल्यास यंदा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देता येणार नाहीत.

किमतीत २००% पेक्षा जास्त वाढ 

द न्यूज इंटरनॅशनल वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्थानिक कागदाच्या किमतीमध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती आणि त्याची गुणवत्ताही परदेशी बनावटीच्या कागदापेक्षा कमी होती. डॉ. कैसर बंगाली म्हणाले की, सरकार आणि खाजगी प्रकाशक यांच्यात किमतीचे गणित अद्याप ठरलेले नाही आणि प्रकाशकांना निश्चित किमतीत पेपर उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.

सध्याच्या स्थितीची वाटचाल मोठ्या संकटाकडे 

पाकिस्तानच्या पब्लिशर्स अँड बुकसेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अझीझ खालिद यांनी सांगितले की, "जानेवारीपासून स्थानिक वृत्तपत्रात प्रति किलो १०० रुपयांची वाढ झाली आहे." ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती मुद्रण आणि पॅकेजिंग उद्योगांना उद्ध्वस्ततेकडे ढकलत आहे. अधिक करांमुळे प्रकाशक पाठ्यपुस्तकांमध्ये आयात केलेला कागद वापरू शकत नाहीत, असे अझीझ यांनी आणखी म्हटले. त्यामुळे स्थानिक प्रकाशकांनी पाठ्यपुस्तकांसाठी पेपर खरेदी करणे बंद केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरमधील पाठ्यपुस्तक प्रकाशकांनी कागदाच्या वाढत्या किमतीमुळे कामकाज थांबवण्याची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी