New Taliban dictate : तालिबानचा नवा फतवा, सरकारवर टीका केली तर होणार कडक शिक्षा

यापुढे तालिबान सरकारवर टीका करणाऱ्यांना शिक्षा दिली जाणार आहे. सरकारवर टीका म्हणजे शत्रूला मदत असा फतवाच तालिबान सरकारने काढला आहे.

New Taliban dictate
तालिबानचा नवा फतवा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तालिबान सरकारवर टीका करणे हा गुन्हा
  • सरकारवर टीका म्हणजे शत्रूला मदत
  • तालिबान सरकारने काढला नवा फतवा

New Taliban dictate : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान सरकार (Taliban Government) स्थिरस्थावर झाल्यानंतर आता त्यांनी खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. यापुढे कुठल्याही सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर (Government employee or officer) टीका (Criticism) करणे नागरिकांना महागात पडणार आहे. कुठलाही सैनिक किंवा सरकारी कर्मचारी यांच्यावर जर वाईट हेतूने टीका केल्याचं दिसून आलं, तर नागरिकांना शिक्षेला सामोरं जावं लागेल, अशी घोषणा तालिबान सरकारकडून करण्यात आली आहे. 

काय आहे नवा कायदा?

तालिबान सरकारच्या गेल्या काही दिवसांतील कामगिरीमुळे देशाचं होणारं नुकसान आणि सरकारची चुकीची धोरणं यावरून देशातील विरोधकांनी सरकारविरोधात टीकेचा सूर आळवायला सुरुवात केली होती. त्यानंतर तालिबानचे ज्येष्ठ नेते अखुंदजादा यांच्या आदेशानुसार नवा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सरकारवर शब्दांवाटे, लिखाणावाटे, हावभावावाटे, चित्रावाटे किंवा इतर कुठल्याही माध्यमातून केलेली अनाठायी टीका टीकेला पात्र ठरणार आहे. या कायद्याला ‘शरीया जिम्मेदारी’ असं नाव देण्यात आल्याची चर्चा आहे. 

अधिक वाचा - Covid Update: कोरोना पुन्हा घाबरावयला लागला! एका दिवसात इतके रुग्ण, ॲक्टिव केसेचा ग्राफ दीड लाखांच्या पुढे गेला

कायदा अस्पष्ट

सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर केलेली अनावश्यक आणि चुकीची टीका शिक्षेस पात्र ठरेल, असं फर्मान तालिबान सरकारनं काढलं असलं तरी नेमक्या कुठल्या प्रकारच्या टीकेला मनाई करण्यात आली आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनेकदा अफगाणिस्तानमधील विविध वृत्तवाहिन्यांवरील राजकीय कार्यक्रमांत तालिबानविरोधकांकडून सरकारवर टीका होत असते. सरकारची कामगिरी, धोरणं आणि राज्यकारभार करण्याची पद्धत या मुद्द्यांवरून टीका होत असते. ही टीकादेखील नव्या कायद्याच्या कक्षेत येणार का, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. मात्र ही संदिग्धता जाणीवपूर्वक ठेवल्याची टीकाही तालिबानविरोधक करत आहेत. सरकारला त्यांच्या टीकाकारांना शांत करता यावं आणि त्यांची मुस्कटदाबी करता यावी, यासाठीच हा नवा कायदा अस्पष्ट स्वरुपात आणण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

अधिक वाचा - Murder for Mango : चिमुकलीनं आंबा मागितल्याचा आला राग, सख्ख्या काकाने असा घेतला जीव

शत्रूची मदत

सरकारवर टीका करणे म्हणजे देशाच्या शत्रूची मदत करणे, असं सरधोपट विधान तालिबाननं केलं आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या सैनिकाचे कपडे ओढत असेल, त्याच्याशी संघर्ष करत असेल किंवा त्याला असहकार्य करत असेल तर तो देशद्रोह असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. सरकारवर टीका हा ‘नकारात्मक प्रचार’ असून त्यामुळे इस्लामचं नुकसान होत असल्याचा दावा केला जात आहे. 

अधिक वाचा - monkeypox : जगभरात मंकीपॉक्सचे १३ हजार रुग्ण, भारतात ३ मंकीपॉक्स रुग्ण

टीकाकारांचा होणार शिरच्छेद?

सरकारवर टीका करणाऱ्यांना नेमकी काय शिक्षा होणार, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या बैठकीत अशा गुन्ह्यांसाठी शिरच्छेदाचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याच बैठकीनंतर काही दिवसांत हा कायदा तयार करण्यात आला आणि त्याची घोषणा करण्यात आली. आता प्रत्यक्ष या गुन्ह्यासाठी काय शिक्षा दिली जाते, ते लवकरच स्पष्ट होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी