Uttarakhand Viral Video : शाळेत रडताना, किंचाळताना, डोकं आपटून घेताना दिसले विद्यार्थी

Bageshwar Viral Video: उत्तराखंडमधील बागेश्वर येथील सरकारी शाळेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून सरकारी यंत्रणा, विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.

Bageshwar Viral Video
शाळेत रडताना, किंचाळताना, डोकं आपटून घेताना दिसले विद्यार्थी 
थोडं पण कामाचं
  • शाळेत रडताना, किंचाळताना, डोकं आपटून घेताना दिसले विद्यार्थी
  • उत्तराखंडमधील बागेश्वर येथील सरकारी शाळेचा एक व्हिडीओ व्हायरल
  • व्हिडीओ बघून सरकारी यंत्रणा, विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत

Bageshwar Viral Video: उत्तराखंडमधील बागेश्वर येथील सरकारी शाळेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून सरकारी यंत्रणा, विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. व्हायरल व्हिडीओत सहा सात विद्यार्थी जोरजोरात रडताना, किंचाळताना, डोकं आपटून घेताना दिसत आहेत. व्हिडीओत थोड्या वेळाने विद्यार्थी बेशुद्ध पडू लागल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ बघणारे अनेकजण विद्यार्थ्यांची कृत्य बघून घाबरले आहेत.  । व्हायरल

बागेश्वरमधील व्हायरल व्हिडीओ ही उत्तराखंडमधील पहिली घटना नाही. याआधी उत्तराखंडमध्येच अल्मोडा, पिथौरागड, चमोली या ठिकाणचे अशाच स्वरुपाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्येही वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी जोरजोरात रडताना, किंचाळताना, डोकं आपटून घेताना दिसत आहेत. व्हिडीओत थोड्या वेळाने विद्यार्थी बेशुद्ध पडत असल्याचेही दिसत आहे. 

व्हायरल व्हिडीओत दिसलेल्या घटना पाहून राज्याच्या शिक्षण विभागाने काही मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा केली. ही परिस्थिती कशी हाताळावी आणि व्हिडीओत दिसणाऱ्या विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधावा यावर विचारविनिमय झाला. यानंतर प्रशासनाने मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू केले आहे. तर स्थानिक पातळीवर नागरिकांनी ही मुलांना झालेली भूतबाधा आहे असे समजून मांत्रिक, पुजारी यांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. 

नागरिकांची वेगवेगळी मते

उत्तराखंडमधील घटनांबाबत नागरिकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. राज्यातील अनेक सरकारी शाळांच्या वर्गांमध्ये पुरेसा प्रकाश येत नाही. खोल्या अंधारल्या आहेत. यामुळेच भितीपोटी विद्यार्थांनी आराडओरडा केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकारी यंत्रणेने मात्र नागरिकांची ही शंका फेटाळली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी