तोंडात लाखोंचे सोने लपवणाऱ्या तस्कराला अटक

बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी एका ४२ वर्षांच्या तस्कराला अटक केली.

Customs sleuths nab passenger at Bengaluru airport for smuggling Rs 4.9 lakh worth gold by hiding it in mouth
तोंडात लाखोंचे सोने लपवणाऱ्या तस्कराला अटक 
थोडं पण कामाचं
  • तोंडात लाखोंचे सोने लपवणाऱ्या तस्कराला अटक
  • तस्कर तामीळनाडूतील चेन्नईचा रहिवासी
  • बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली अटक

बंगळुरू: बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी एका ४२ वर्षांच्या तस्कराला अटक केली. या तस्कराने तोंडामध्ये सुमारे ४ लाख ९० हजार रुपयांचे सोने लपवले होते. तस्कर तामीळनाडूतील चेन्नईचा रहिवासी आहे. तो दुबईतून बंगळुरूला येणाऱ्या विमानात बसला होता. Customs sleuths nab passenger at Bengaluru airport for smuggling Rs 4.9 lakh worth gold by hiding it in mouth

तस्कर विमानातून उतरला त्यावेळी त्याच्या हालचाली पाहून कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला. अखेर त्याची तपासणी करण्याचा निर्णय झाला. तपासणी करताना कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सहजतेने जास्त बोलत नसल्याचे पाहून संशयास्पद वाटलेल्याला तोंड पूर्ण उघडण्यास सांगितले. तोंड उघडताच कस्टमने केलेल्या तपासणीत सोने आढळले. तस्कराने हुशारीने तोंडामध्ये सोने लपवले होते. 

कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तस्कराने तोंडात लपवलेले सोने जप्त केले आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याला ताब्यात घेतले. आरोपीने कस्टमच्या चौकशीत कबूल केले की तो १४ ऑक्टोबर रोजी चेन्नईतून दुबईला गेला आणि तिथून सोन्याचे पंधरा तुकडे तोंडात लपवून बंगळुरूत आला. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९८ कोटी रुपयांचे १४ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या प्रकरणात एका पुरुषाला आणि एका महिलेला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी झाम्बियातून कतार एअरवेजच्या विमानाने दिल्लीला आले होते. ते विमानाने टर्मिनल तीन वर आले होते. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयावरुन चौकशी केल्यानंतर दोघांना अटक केली आणि हेरॉइन जप्त केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी