अमेरिकेवर सायबर हल्ला, पाईपलाईन नेटवर्क बंद, इंधनाचा पुरवठा झाला ठप्प, रशियाने केल्याचा संशय

लोकल ते ग्लोबल
Updated May 09, 2021 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

अमेरिकेतील एक प्रमुख पाईपलाईन ऑपरेटर कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यानंतर या पाईपलाईन ऑपरेटरला (Cyber Attack on Pipeline Operator) आपले संपूर्ण नेटवर्क बंद करण्याची वेळ आली आहे.

Cyber attack on USA
अमेरिकेवर सायबर हल्ला 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेत सायबर हल्ला
  • कोलोनियल पाईपलाईन नेटवर्कवर हल्ला
  • इंधन पुरवठा झाला ठप्प

नवी दिल्ली: अमेरिकेतील एक प्रमुख पाईपलाईन ऑपरेटर कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यानंतर या पाईपलाईन ऑपरेटरला (Cyber Attack on Pipeline Operator) आपले संपूर्ण नेटवर्क बंद करण्याची वेळ आली आहे. या पाईपलाईन ऑपरेटर कंपनीने रॅनसमवेअर (Ransomware) हल्ला झाल्याचे सांगितले आहे. 
कोलोनियल पाईपलाईन (Colonial Pipeline)असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीने सांगितले आहे की कंपनीच्या सायबर सिक्युरिटीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना कंपनीने काही यंत्रणांना ऑफलाईन केले आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात कंपनीचे पाईपलाईन ऑपरेशन थांबले आहे आणि कंपनीच्या आयटी सिस्टमवला याचा फटका बसला आहे. या प्रकारच्या हल्ल्यासाठी अमेरिकेने नेहमीच रशियाला जबाबदार ठरवले आहे.

कोलोनियल पाईपलाईन वर हल्ला


कोलोनियल पाईपलाईन (Colonial Pipeline)शनिवारी दुसरे पत्रक जाहीर करत या घटनेत रॅनसमवेअरचा हात असल्याचे स्पष्ट केले. रॅनसमवेअर हा एक प्रकारचा मालवेअर असतो ज्यात डाटा एन्क्रिप्ट करून सिस्टमला लॉकडाऊन करून टाकतो. यानंतर पुन्हा डेटापर्यत पोचायचे असल्यास सायबर हल्लेखोर यासाठी खंडणीची मागणी करतात. मागील पाच वर्षात रॅनसमवेअरच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली आहे. कोलोनियल पाईपलाईन नेटवर्क अमेरिकेतील तेलशुद्धीकरण प्रकल्पांमधूनन देशातील पूर्व आणि दक्षिणेच्या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये इंधनाचा पुरवठा करते. कंपनी दररोज २५ लाख बॅरल पेट्रोल, डिझेल, जेट फ्युएल आणि इतर रिफाईन्ड उत्पादनांची वाहतूक करते. आता हा सर्व पुरवठा खंडित झाला आहे. या पाईपलाईनचे जाळे ८,८५० किलोमीटर पसरलेले आहे.

पाईपलाईनची सिस्टम पूर्णपणे सुरक्षित नाही


कोलोनियल पाईपलाईन या कंपनीचे म्हणणे आहे की ते अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या भागांमधील मागणीच्या ४५ टक्के पुरवठा एकट्यानेच करते. अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी एजेन्सीचे कॉम्प्युटर सायंसिस्ट आणि नोत्र डॅम विद्यापीठाच्या मेंडोजा कॉलेज ऑफ बिझनेसचे प्रोफेसर माईक चॅपल यांनी सांगितले की या हल्ल्याने पाईपलाईनच्या पायाभूत यंत्रणेला नियंत्रित करणाऱ्या प्रणालीलाच हादरवून टाकले आहे. या हल्ल्यावरून दिसते की हा हल्ला खूप बारकाईने आणि गुंतागुंतीच्या पद्धतीने करण्यात आला आहे किंवा मग ही पाईपलाईन यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यांनी म्हटले आहे की ही पाईपलाईन बंद झाल्याने हा संदेश गेला आहे की आमच्या राष्ट्राच्या पायाभूत यंत्रणा सायबर हल्ल्याच्या आवाक्यात सहजपणे येऊ शकतात.

अमेरिकेवर याआधी दोनदा सायबर हल्ला


कोलोनियल पाईपलाईन या कंपनीने म्हटले आहे की या हल्ल्याचा तपास करण्यासाठी खासगी सिक्युरिटी कंपनीला ठेवण्यात आले आहे. याशिवाय कायदा सल्लागार एजन्सी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला आहे. सध्या आमचे पूर्ण लक्ष सुरक्षित आणि कार्यक्षमपणे आमची सेवा सुरू करण्यावर आहे. म्हणजे आम्हाला आमचे कामकाज सुरळीत करता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत दोन मोठे सायबर हल्ले झाले आहेत. सोलरवाइंड हल्ल्यामुळे अमेरिकन सरकार आणि खासगी क्षेत्रतील हजारो संगणकांना याचा फटका बसला आहे. या हल्ल्यांसाठी अमेरिकेने रशियाला जबाबदार ठरवले आहे. दुसरा सायबर हल्ला मायक्रोसॉफ्टच्या ईमेल सर्व्हरवर करण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी