Cyber Crime: सुंदर मुलगी आधी करते अश्लील चॅटिंग, अन् नंतर लावते पुरुषांची वाट

Whatsapp Chatting Case: काही सुंदर मुली सायबर गुन्हेगारांच्या साथीने तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात अन् नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचं काही प्रकरणं समोर

cyber criminals are trapping you in unethical way making video calls to girls
सुंदर मुलगी आधी करते अश्लील चॅटिंग, अन् नंतर लावते पुरुषांची वाट (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सायबर क्राइममध्ये सातत्याने वाढ सुरु
  • सुंदर तरुणींच्या मदतीने पुरुषांची फसवणूक
  • अश्लील चॅटिंग करुन नंतर केली जाते फसवणूक

धनबाद (झारखंड) : सायबर गुन्हे (Cyber Crime) करणाऱ्या गुन्हेगारांनी आता आणखी एक नवीन ट्रेंड (trend) सुरू केला आहे. ज्यामध्ये आता मुलींना पार्टनर बनवण्यात आले आहे. सायबर क्राईमच्या संघटित टोळीत सामील असलेली एक तरुणी फेसबुक इंस्टाग्रामसह विविध इंटरनेट माध्यमांद्वारे लोकांशी व्हॉट्सअॅपद्वारे (Whatsapp) संपर्क साधते आणि नंतर व्हॉट्सअॅपच्या डीपीवर सुंदर मुलींची फोटो ठेवून चॅटिंग सुरू करते. (cyber criminals are trapping you in unethical way making video calls to girls)

प्रथम या सगळ्याची सुरुवात हाय, हॅलोने होते. पण नंतर चॅटिंगद्वारे अनैतिक कामाची ऑफर दिली जाते. जो व्यक्ती मुलीचे सुंदर चित्र पाहून तो तिची मोहक ऑफर स्वीकारतो पण त्याची अवस्था अत्यंत वाईट अशीच होते. सायबर क्राईममध्ये गुंतलेली तरुणी ऑनलाइन अनैतिक काम करण्याची ऑफर देते. मग समोरील व्यक्ती देखील ही ऑफर स्वीकारून काही अनैतिक कृत्य करते तेव्हा ती मुलगी त्या व्यक्तीचा मेसेजचा स्क्रीनशॉट काढून ठेवते.

अधिक वाचा: Online Fraud : ऑनलाइन फर्निचर विकणे पडले महागात, फसवणूक करणाऱ्यांनी खात्यातून लंपास केली 3 लाखांहून अधिक रक्कम

यानंतर मुलगी संबंधित व्यक्तीकडे पैशाची मागणी करते, पैसे देण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला तिचा अश्लील स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नंबरवर त्याच्या चॅटिंगचे हे अश्लील फोटो पाठवण्याची धमकी दिली जाते. 

सायबर गुन्हेगारांकडून अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केल्याची अनेक प्रकरणे अलीकडच्या काळात समोर आली आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये पीडित व्यक्ती हे बदनामीच्या भीतीने पोलीस ठाण्यात जाण्याचेही टाळतात. 

अधिक वाचा: Pune News: राज्यातील भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

झारखंडच्या बिशूनपूर आणि बारतांड येथे राहणाऱ्या दोन व्यक्तींना अशीच ऑफर आली होती आणि ते देखील मुलींच्या जाळ्यात अडकले होते. त्यानंतर अनेक प्रयत्नांनंतर नंबर ब्लॉक करून फसवणूक करणाऱ्या टोळीकडून सुटका करुन घेतली केली. असाच प्रकार सराई ढेला परिसरातही आशिष नावाच्या तरुणासोबत घडला होता. पीडित तरुणाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्याच्यासोबत घडलेला प्रसंग कथन केला. यावेळी तरुणांनी अशा लबाड मुलींपासून सावध राहण्याचे आवाहन देखील तरुणाने केले आहे. 

महाराष्ट्रातही घडतायेत असेच प्रकार 

दरम्यान, महाराष्ट्रातही अशाच प्रकारे सायबर क्राईम होत असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यावेळी कुडाळकर यांनी काही पैसे देखील ट्रान्सफर केले होते. मात्र, नंतर पैशाची मागणी वाढताच कुडाळकर यांनी पोलिसात धाव घेतली होती. ज्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास करत राजस्थानमधून एका व्यक्तीला अटक केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी