Cyclone Jawad : प्रती तास 90 किमी वेगाने धडकणार वादळ; ओडिशा सरकारकडून किनारपट्टीच्या भागातील 13 जिल्ह्यांना अलर्ट

Cyclone Jovad: अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत असलेल्या आहे, त्यात हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या चक्रीवादळाच्या (Cyclone) इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Cyclone Jovad:  Odisha government issues alert to 13 coastal districts
Cyclone Jawad : ओडिशा सरकारकडून १३ जिल्ह्यांना अलर्ट   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • चक्रीवादळाचा जवद असं नाव देण्यात आले आहे.
  • हवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
  • शनिवारी पहाटेच्या सुमारास हे वादळ लॅण्ड फॉल करेल

Cyclone Jovad: नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत असलेल्या आहे, त्यात हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या चक्रीवादळाच्या (Cyclone) इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळू लागला आहे, त्यात हवामान खात्याने जवाद चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता वर्तवली आहे. ओडिशा सरकारने (Odisha government) जवाद चक्रीवादळासंदर्भात इशारा दिला आहे. 4 डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला (Coastal Area) धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा जवद असं नाव देण्यात आले आहे. सौदी अरेबियाने (Saudi Arabia) हे नाव दिले आहे. जवद हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने किनारपट्टी भागातील 13 जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर क्रेंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगड आणि कोराटपुट जिल्ह्यांमध्ये शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र असून त्याची तीव्रता सध्या वाढत आहे. आज 2 डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. 

आपत्कालीन परिस्थितीन निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशामन दलाच्या तुकड्यांची मदत घेण्यात येणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी. के. जेना यांनी सांगितले की,  समुद्रामध्ये वादळ निर्मितीसंदर्भातील परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. हवेचा वेग हा 45 ते 55 किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग 65 किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास हे वादळ लॅण्ड फॉल करेल म्हणजेच समुद्रामधून जमीनीवर दाखल होईल. याचा फटका ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यात आहे.

जमिनीला धडकल्यानंतर त्याचा वेग 80 ते 90 किमी प्रती तास इतका असेल. भारतीय हवामान खात्याचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्रा यांनी हे वादळ ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचे म्हटलं आहे. मात्र लॅण्डफॉल नक्की कुठे होणार हे सांगता येणार नाही असेही म्हटले आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 3 डिसेंबरपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ओडिशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीचा भाग असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तीन डिसेंबरपासून जोरदार पाऊस होईल असे महापात्रा म्हणाले आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी