Cyclone News : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा, महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चक्रीवादळ आज उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Cyclone warning in Bay of Bengal,  effect of cold in Maharashtra?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी थंडी ही कमी जाणवणार आहे.
  • उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
  • आज तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Cyclone News : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाल्याने  तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain)अंदाज हवामान विभागाने (IMD)वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हे चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी 10 किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे. दरम्यान या चक्रीवादळांमुळे महाराष्ट्रातील थंडीवर परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी थंडी ही कमी जाणवणार आहे. (Cyclone warning in Bay of Bengal,  effect of cold in Maharashtra?)

अधिक वाचा  : याचा अर्थ या संघटनेने सुपारी घेतलेली आहे - संदीप देशपांडे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चक्रीवादळ आज उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याची दक्षता घेत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या राज्यातील काही जिल्ह्यांधील  शाळांना सुट्टी जाहीर  जाहीर करण्यात आली आहे. 

अधिक वाचा  : लोकसभेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील खासदारांमध्ये खडाजंगी

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर शुक्रवारी 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता आहे. तमिळनाडूतील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे.

अधिक वाचा : विधानसभा निवडणूक निकाल

आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम

बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक  प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता जाणवणार नाही. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या  विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळे त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे.  तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी  किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी