Dalai Lama Kissing Video: स्टेजवरच ओठांचं घेतलं चुंबन आणि... दलाई लामांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 10, 2023 | 11:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dalai Lama Kissing Video: तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियालवर व्हायरल झाला (viral Video)आहे. दलाई लामा हे एका अल्पवयीन मुलाच्या ओठांचं चुंबन (Kiss Video) घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आता या व्हिडीओवरून मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

dalai lama kissing Video Viral
दलाई लामांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • माझी उत्तराधिकारी जर महिला होणार असेल तर ती 'आकर्षक' असावी, असं वक्तव्य करून दलाई लामा यांनी वाद ओढवून घेतला होता.
  • लाई लामा हे मुलाची गंमत करत असल्याचे अनुयायींनी म्हटलं आहे.
  • दलाई लामा यांनी आपली जीभ बाहेर काढून 'सक माय टंग' (माझी जीभ चोख) असं म्हटलं.

Dalai Lama Kissing Video: तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) हे त्यांच्या वक्तव्यावरून कायम चर्चेत असतात. आता तर दलाई लामा यांचा एक व्हिडीओ समोर (viral Video) आला आहे. एका अल्पवयीन मुलाचं स्टेजवर चुंबन घेताना दलाई लामा दिसत आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होत आहे. दलाई लामा मुलाचं चुंबन घेताना त्याला ते आपली जीभ चोखायला (Kiss Video) सांगितल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून दलाई लामा यांच्यावर टीकेची झोड देखील उठली आहे. नेटिझन्स संताप व्यक्त करताना दिसत आहेत. ( Dalai lama kissing Video Viral the Minor boys lips on the stage and said such a thing created a ruckus) 

दलाई लामा एका कार्यक्रमात उपस्थित होते. एक मुलगा दलाई लामा यांचं स्वागत करण्यासाठी पुढे आला असता दलाई लामा यांनी मुलाला जवळ घेतलं. त्यानंतर त्याचं चुंबन घेतलं. इतकंच नाही तर दलाई लामा यांनी आपली जीभ बाहेर काढून 'सक माय टंग' (माझी जीभ चोख) असं म्हटलं. या घटनेच्या व्हिडीओ समोर येताच दलाई लामा यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. दलाई लामा यांची वर्तवणूक अत्यंत घृणास्पद आणि अशोभनिय असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. तर काहींनी ही कृती म्हणजे 'पीडोफिलिया' असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओत...

दलाई लामा यांचं स्वागत करण्यासाठी एक मुलगा स्टेजवर आदरपूर्वक येतो. त्यांचा आशीर्वाद घेणार तितक्यात दलाई लामा मुलाला जवळ घेतात. त्याच्या ओठांवर चुंबन करतात. काही वेळात ते त्याला आपली जीभ चोखणार का? असा सवाल करतात आणि चक्क जीभ बाहेर काढून मुलाला चोखायला सांगतात, असं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अनुयायी म्हणाले ते गंमत करत होते...

दलाई लामा यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर त्यांच्या बचावासाठी अनुयायी समोर आले आहेत. दलाई लामा हे मुलाची गंमत करत असल्याचे अनुयायींनी म्हटलं आहे. परंतु, नेटिझन्स प्रचंड संतापले असून एका प्रभावशाली धर्मगुरूंकडून मुलाचं शोषण होत आहे आणि अनुयायी त्याला गंमत असं नाव दिलं जात असं असल्याचे टीकाकारांनी म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर उमटत आहे तिखट प्रतिक्रिया...

दलाई लामा यांचा तो वादग्रस्त व्हिडीओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे. सोशल मीडियातून त्यावर तिखट प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहे. 'दलाई लामा यांनी बौद्ध कार्यक्रमात एका अल्पवयीन मुलाचं चुंबन घेतलं. तसेच आपली जीभ बाहेर काढून ती चोखण्यास सांगितली, पण त्यांनी असं का केलं असावं, असा सवाल  जूस्ट ब्रोकर्स या महिलेने व्हिडीओ ट्वीट करत केला आहे.

अटकच करायला हवी...
 
दलाई लामांची वर्तवणूक अत्यंत घृणास्पद असल्याचे जस ओबेरॉय (Jas Oberoi) नामक युजरनं म्हटलं आहे. 'हे मी काय पाहत आहे? हे दलाई लामा आहेत का? यांना तात्काळ अटक करावी', अशी मागणी देखील जस ओबेरॉय यांनी केली आहे. 

दलाई लामांच्या वक्तव्यांने आधीही झाला होता वाद..

दलाई लामांवरून वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. दलाई लामा यांनी सन 2019 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. माझी उत्तराधिकारी जर महिला होणार असेल तर ती 'आकर्षक' असावी, असं वक्तव्य करून दलाई लामा यांनी वाद ओढवून घेतला होता. धर्मशाळेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याच्या निर्वासनातून प्रसारित झालेल्या ब्रिटीश ब्रॉडकास्टरला दिलेल्या इंटरव्हूमध्ये दलाई लामा यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. मात्र, त्यानंतर जाहीर माफी मागून त्यांनी या वादावर पडदा देखील टाकला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी