Dalit Minor Girl Raped : जयपूर : काही दिवसांपूर्वी एका दलित विद्यार्थ्याने (dalit student) माठातील पाणी प्यायले म्हणून शिक्षकाने त्याला जबर मारहाण (beat) केली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना राजस्थानमध्ये एका दलित अल्पवयीन मुलीवर गोठ्यात सामूहिक बलात्कार (dalit minor girl gangraped) करण्यात आला आहे. या मुलीला घरातून उचलून एका गोठ्यात अत्याचार करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा (fir) दाखल केला आहे. (dalit minor girl raped in rajasthan fir file by police)
मिळालेल्या माहितीनुसार १७ ऑगस्ट रोजी करौली जिल्ह्यातील एका गावात एक दलित अल्पवयीन मुलगी घरात झोपली होती. तेव्हा रात्री आरोपींनी तिला उचलून नेले आणि जवळच्या एका गोठ्यात तिच्यावर बलात्कार केला. रात्री १२ वाजता तिच्या आईला जाग आली तेव्हा मुलगी आसपास नसल्याने ती घाबरून गेली. त्यांनी जवळपास शोधले परंतु मुलगी सापडली नाही.
कल UP में भी वैसे ही घटना हुई जैसी राजस्थान में हुई थी, घटना के बाद ये देखना चाहिए कि क्या सरकारी या पुलिस स्तर पर लापरवाही हुई? या क्या कोई कार्रवाई नहीं हुई हो? तो बात करना चाहिए क्योंकि घटना कहां नहीं होती। घटना किसी के साथ हो सभी को दुख होता है: अशोक गहलोत, राजस्थान CM,जयपुर pic.twitter.com/f647LwgZqV — ANI_HindiNews (@AHindinews) August 21, 2022
दलित-गैर दलित थोड़ी करना चाहिए। आप (बीजेपी) हर चीज़ को राजनीति के तौर से मुद्दा बनाएंगे तो इससे समाज को फायदा नहीं होगा: अशोक गहलोत, राजस्थान के मुख्यमंत्री,जयपुर — ANI_HindiNews (@AHindinews) August 21, 2022
अधिक वाचा : Hemant Soren : झारखंडचे सोरेन सरकार संकटात? ११ आमदार बैठकीला अनुपस्थित
अखेर १९ ऑगस्ट रोजी मुलीच्या आई वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संपूर्ण गाव शोधून काढला तेव्हा. घराजवळ एका गोठ्यात जखमी अवस्थेत मुलगी पडली होती. पोलिसांनी तिल आधी रुग्णालयात दाखल केले आणि कुटुंबीयांकडे सुपुर्द केले.
अधिक वाचा : Manish Sisodia यांच्यावर अटकेची तलवार, जाणून घ्या काय असते Lookout नोटीस
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे परंतु अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.