J&K Cross Border Tunnel Detected: पाकिस्तानच्या (Pakistan) चमन बोगद्याच्या कटाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) धोका पोहोचवण्यासाठी आणि अंमली पदार्थांचा दहशतवाद वाढवण्याच्या उद्देशाने भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सीमेवर (border) खोदण्यात आलेला बोगदा बीएसएफने (BSF) शोधून काढला आहे. हा बोगदा (Tunnel) दहशतवाद्यांनी (terrorists) पाकिस्तानी लष्कराच्या देखरेखीखाली पाकिस्तानच्या व्यावसायिक अभियंत्यांच्या मदतीने बांधला होता. गेल्या दीड वर्षात बीएसएफने पाचवा बोगदा शोधून काढला आहे.
हा बोगदा बॉर्डरच्या सांबा सीमेजवळील भारतीय हद्दीतील चक फकिरा चौकीजवळ सापडला आहे. हा बोगदा इतका वेगळ्या पद्धतीने खोदण्यात आला आहे की तो सामान्य दहशतवादी खोदू शकत नाही. बुधवारी संध्याकाळी सांबा सेक्टरच्या परिसरात नियमित तपासणी सुरू असताना सीमा सुरक्षा दलाला या बोगद्याची माहिती मिळाली. या बोगद्याचे तोंड अशाप्रकारे झाकले होते की बोगदा सहज ओळखता येणार नव्हता. प्राथमिक तपासादरम्यान, बीएसएफला कळले आहे की हा बोगदा पाकिस्तानी सीमेतील चमन खुर्द फियाजच्या पाकिस्तानी लष्कराच्या चौकीजवळ सुरू होतो, जो तेथून सुमारे 900 मीटर अंतरावर आहे. हा बोगदा भारतीय हद्दीत येतो आणि 150 मीटर अंतरावर बाहेर येतो. म्हणजेच पाकिस्तानी लष्कराच्या देखरेखीखाली सुमारे 1 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे.
बीएसएफचा असा विश्वास आहे की, हा बोगदा नुकताच खोदला गेला आहे. जम्मूमध्ये सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत दहशत पसरवण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आणि दारूगोळा पाठवणे हाही त्याचा उद्देश असू शकतो. याशिवाय नार्को दहशतवाद वाढवणे हाही या बोगद्याचा उद्देश असू शकतो. हा बोगदा इतका मोठा आहे की माणूस शस्त्र घेऊन किंवा अंमली पदार्थांनी भरलेली पोती घेऊन आरामात प्रवेश करू शकतो. ज्याप्रकारचा हा बोगदा आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानी लष्कराच्या देखरेखीखाली हा बोगदा खोदण्यात आला असून एखाद्या व्यावसायिक अभियंत्यांच्या निर्देशानुसार हा बोगदा दहशतवाद्यांनी खोदला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या दीड वर्षात हा पाच बोगदे शोधण्यात आली आहेत. हा बोगदा अशा ठिकाणी खोदला गेला आहे जेथे वालुकामय चिकणमाती मातीचे ढिगारे आहेत म्हणजेच पाणी गळतीचा धोका नाही. दरम्यान, या बोगद्यातून दहशतवादी भारतीय हद्दीत घुसले आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे. बोगद्याचा धोका लक्षात घेता बीएसएफच्या माहितीवरून सर्व गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून आजूबाजूच्या परिसरात सखोल शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.