मुलीच्या बॉयफ्रेंडला कंटाळून आईने मुलासोबत मिळून केली मुलीची हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 20, 2019 | 15:54 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

गाझियाबादमध्ये एका आईने आपल्या मुलासोबत मिळून आपल्याच मुलीची हत्या केली. ती आपल्या मुलीच्या बॉयफ्रेंडला कंटाळली होती. यासाठी तिने हे पाऊल उचलले.

murder
हत्या  |  फोटो सौजन्य: Getty Images

गाझियाबाद: मुलीच्या बॉयफ्रेंडला कंटाळून जन्मदात्या आईनेच तिची हत्या केली. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना घडली. महिलेने आपल्या मुलाच्या मदतीने आपल्या १५ वर्षाच्या मुलीची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे एका मुलासोबत अफेयर होते. ज्यामुळे तिची आई खूप नाराज होती. लोणी बॉर्डर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या मुलाला हत्या आणि पुरावे लपवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. 

आरोपी महिला मृत मुलीचे शव मोटारसायकलवरून नेत असताना तेथील स्थानिकांनी त्यांना हटकले मात्र आरोपी महिलेने योग्य उत्तर न दिल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि हे प्रकरण प्रकाशात आले. तक्रारदार चांद अन्सारी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या घराजवळच्या डेअरीमध्ये बसलो होतो. त्यावेळी तेथे एक व्यक्ती आला आणि त्यांना विचारले की प्लास्टिक बॅग पाहिली आहे का ज्यामध्ये लोखंडाचे सामान ठेवण्यात आले आहे. 

जेव्हा ती व्यक्ती निघून गेली त्यानंतर काही वेळातच काही लोकांनी पाहिले की तीच व्यक्ती स्कूटरवर एक पिवळी प्लास्टिकची पिशवी घेऊन जात आहे. ती पिशवी वजनदार होती. त्यामुळे तेथील लोकांना संशय आला आणि ते स्कूटरजवळ गेले. त्यांनी पाहिले की प्लास्टिक बॅगेमध्ये एका तरूणीचा मृतदेह असून तिचे पाय रशीने बांधण्यात आले आहेत. 

आरोपी महिलेवर संशय

स्थानिकांच्या माहितीनुसार, स्कूटरवर त्याची आईही मागे बसली होती. जिने ही बॅग पकडली होती. जेव्हा लोकांनी विचारले की बॅगेत काय आहे तेव्हा तिने काहीच उत्तर दिले नाही. पोलिसांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान महिलेने सांगितले की ती आपल्या मुलीच्या वागणुकीमुळे त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले. 

हत्या केल्याप्रकरणी अटक

महिलेने पुढे सांगितले, गेल्या तीन महिन्यांत त्यांनी आठ वेळा भाड्याचे घर बदलले होते. दरवेळेला तिची मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला नव्या घराचा पत्ता देत असे आणि तो तिला भेटण्यासाठी घरी यायचा. यामुळे ती आई वैतागली होती. ही आरोपी महिला विधवा असून तिचा मुलगा एका दुकानात काम करतो. तक्रारीनुसार आरोपी महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध हत्येची केस दाखल करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुलीच्या बॉयफ्रेंडला कंटाळून आईने मुलासोबत मिळून केली मुलीची हत्या Description: गाझियाबादमध्ये एका आईने आपल्या मुलासोबत मिळून आपल्याच मुलीची हत्या केली. ती आपल्या मुलीच्या बॉयफ्रेंडला कंटाळली होती. यासाठी तिने हे पाऊल उचलले.
Loading...
Loading...
Loading...