'सूर्यवंशी'वर दाऊद इब्राहिमची 'गर्लफ्रेंड' भडकली, म्हणाली, इस्लामोफोबिया पसरवणारा बॉलिवूड चित्रपट

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 18, 2021 | 14:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dawood Ibrahim's 'Girlfriend' erupts on 'Suryavanshi', says Bollywood film spreading Islamophobia बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकताच प्रदर्शित झालेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट लोकांना मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. पण पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातने 'सूर्यवंशी'वर शाब्दिक हल्ला केला आहे. हा चित्रपट इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप तिने केला आहे.

 Dawood Ibrahim's 'Girlfriend' erupts on 'Suryavanshi', says Bollywood film spreading Islamophobia
'सूर्यवंशी'वर दाऊद इब्राहिमची 'गर्लफ्रेंड' भडकली, म्हणाली, इस्लामोफोबिया पसरवणारा बॉलिवूड चित्रपट।  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • 'सूर्यवंशी' हा बॉलीवूड चित्रपट लोकांना मोठ्या प्रमाणात पसंत केला
  • पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातने 'सूर्यवंशी'वर शाब्दिक हल्ला केला
  • अलीकडचा बॉलिवूड चित्रपट 'सूर्यवंशी' इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देतो.

 Dawood Ibrahim's 'Girlfriend' erupts on 'Suryavanshi', says Bollywood film spreading Islamophobia इस्लामाबाद :  बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकताच प्रदर्शित झालेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट लोकांना मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. त्याचबरोबर काही लोक चित्रपटाच्या आशयाला टार्गेट करत आहेत. आता पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातने 'सूर्यवंशी'वर शाब्दिक हल्ला केला आहे. हा चित्रपट इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप तिने केला आहे. महविश हयात ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

मेहविशने बुधवारी ट्विटरवर लिहिले की, अलीकडचा बॉलिवूड चित्रपट 'सूर्यवंशी' इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देतो. हॉलीवूडमध्ये गोष्टी बदलत आहेत आणि मला आशा आहे की सीमेपलीकडील लोक त्याचे अनुसरण करतील. मी म्हटल्याप्रमाणे, जर तुम्हाला ते नीट दाखवता येत नसेल, तर किमान मुस्लिमांचे चित्रण ज्या पद्धतीने केले जाते त्याबद्दल तरी न्याय्य राहा. द्वेष करू नका,
 

महविश दाऊदपेक्षा 27 वर्षांनी लहान 

यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दाऊदचे पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातसोबत रिलेशनशिप असल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी समोर आल्याने डॉन संतापला असून ही माहिती सार्वजनिक कशी झाली याचा तपास करत असल्याचेही बोलले जात होते. दाऊदपेक्षा 27 वर्षांनी लहान असलेला महविश ही त्याची सध्याची सर्वात मोठी कमजोरी असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

डॉनच्या मदतीने अनेक प्रोजेक्ट मिळाले

मेहविशला 'तमगा-ए-इम्तियाज' हा नागरी सन्मान दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच गेल्या वर्षी याची चर्चा सुरू झाली होती. एका आयटम साँगमध्ये महविशला पाहून दाऊदला भुरळ पडली होती आणि यानंतर त्याने महविशला अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे बोलले जाते. मेहविशची ओळख लोड वेडिंग, पंजाब नही जाउंगी आणि अॅक्टर-इन-लॉ या चित्रपटांमुळे झाली. लवकरच असे सांगण्यात आले की मेहविशला कराचीतील काही प्रभावशाली व्यक्तीकडून मदत केली जात आहे ज्यांचे तहरीक-ए-इन्साफ पक्षाशी चांगले संबंध आहेत. नंतर तो माणूस दाऊद असल्याचा दावा करण्यात आला.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी