Corona Vaccination : नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना (Corona ) प्रकरणांमध्ये, मुलांच्या (children) लसीकरणाशी (vaccination) संबंधित एक चांगली बातमी समोर येत आहे. आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस (Corona vaccine) मिळणार आहे. DCGI कडून कोवॅक्सिनला (Covacin) मान्यता देण्यात आल्याचं समजत आहे. लहान मुलांना लवकरात लवकर कोरोनाची लस देण्याची मागणी होत होती. भारत बायोटेकच्या (India Biotech) या लसीला डीसीजीआयकडून परवानगी मिळावी याची प्रतिक्षा दीर्घकाळापासून होती. आता या लसीला मान्यता मिळाली आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की DCGI ने लहान मुलांसाठी तीन लसींचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. DCGI ने मंजूर केलेल्या तीन लसी म्हणजे 12 वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी जायडस कोविड (Zydus Covid), 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवाक्सिन (Covaxin) आणि 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोर्बेवैक्श (Corbevax).पुढील आठवड्यापासून ही लस खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. या केंद्रांवर पालक आपल्या मुलांना लसीकरण करू शकतील. सध्या, भारतात, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोविड-19 लढणाऱ्या लसींचे लसीकरण केले जात आहे.
दरम्यान देशात परत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 2,483 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही शास्त्रज्ञांनी चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. या लाटेपासून वाचण्यासाठी आरोग्य खात्याकडून काळजी घेतली जात असून आता लहान मुलांचेही लसीकरण केलं जात आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते. आता DCGI ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सीन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु आता लहान मुलेदेखील कोरोनाचा नवीन प्रकार XE च्या शिकार होऊ शकतात. शाळा सुरू झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाईल.
देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना महामारीविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण सुरू केले. त्यानंतर १ मार्चपासून त्याची व्याप्ती वाढवण्यात आली. 1 मार्चपासून, फ्रंटलाइन कामगार आणि 45 वर्षे आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराने ग्रस्त असलेल्यांचे लसीकरण सुरू केले. नंतर, 1 मे पासून सर्व प्रौढ व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात देशात 22 लाख 83 हजार 224 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 187 कोटी 95 लाख 76 हजार 423 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
देशात सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाली आहे. दररोज देशात एक हजारांहून कमी प्रकरणं नोंदवली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध संपले आहेत. तरीही मास्क वापरणं आवश्यक आहे. कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. दरम्यान, लहान मुलांचा एक मोठा वर्ग अद्याप लसीकरण झाले नसल्यामुळे, त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. "लहान मुलांमधील लक्षणे साधारणपणे सौम्य असतात आणि त्यात ताप, नाक वाहणे, घसा दुखणे, अंगदुखी आणि कोरडा खोकला यांसारख्या वरच्या श्वसनमार्गाच्या लक्षणांचा समावेश होतो.
तज्ज्ञांनी सांगितले की, पालकांनी त्यांच्या मुलांना निरोगी जीवनशैली, वेळेवर खाणे-झोपणे, स्वच्छता पद्धतींचे पालन करणे, तसेच लसीकरणास पात्र असलेल्या मुलांनी ते लवकरात लवकर घ्यावे याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी चांगले पोषण आणि निरोगी जीवनशैली देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. घरामध्ये तसेच शाळेच्या आवारात प्राथमिक स्वच्छतेची काळजी देखील घेतली पाहिजे, ज्यात स्वच्छता आणि हात धुण्याच्या पद्धतींचा समावेश आहे.