Life after Death : मी माझी डेड बॉडी पाहिली, मृत्यूच्या दाढेतून परतलेल्यांचे थरारक अनुभव

मृत्यूनंतर काय घडतं, हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. मात्र काही लोकांचे अनुभव त्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. हे असे लोक आहेत जे काही कारणामुळे काही क्षणांसाठी मरण पावले होते आणि वैद्यकीय चमत्काराने पुन्हा जिवंत झाले.

Life after Death
“मी माझी डेड बॉडी पाहिली”  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मृत्यूनंतर काय घडतं?
  • काहीजणांनी घेतला अनुभव
  • शेअर केले आपले अनुभव

Life after Death | आपल्या मृत्यूनंतर पुढे काय होतं, याचं उत्तर अद्याप कुणालाच मिळालेलं नाही. प्रत्येकानं आपापल्या परिनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही ठोसपणे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलं नाही. जगातील सर्वात बुद्धीवान लोकांनीही या विषयावर बराच रिसर्च केला आहे, मात्र कुठल्याही ठोस निष्कर्षावर पोहोचू शकले नाहीत. मृत्यूनंतर पुढे काय होतं, याबाबत अनेक संकल्पना जन्माला आल्या आहेत. पुराणापासून ते आधुनिक साहित्यापर्यंत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही मृत्यूनंतरच्या घटनांबाबतचं गूढ कायम असून प्रत्येकाला त्याबाबत उत्सुकता आहे. 

मृत्यूनंतरचं जग

या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी काही व्यक्तींवर संशोधन करण्यात आलं. या व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या काही अवधीसाठी मरण पावल्या होत्या आणि नंतर पुन्हा जिवंत झाल्या. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना एकत्र करण्यात आलं, त्यांचे वेगवेगळे गट करण्यात आले आणि त्यांच्या अनुभवांच्या आधारे मृत्यूदरम्यानचे त्यांचे अनुभव नोंदवण्यात आले. या लोकांची तीन गटांत विभागणी करण्यात आली. ज्यांना मृत्यूबाबत काहीही जाणवलं नाही, अशांचा पहिला गट. मृत्यूनंतर इतर व्यक्तींशी बोलू शकले असे लोक दुसऱ्या गटात तर एक प्रकारचा प्रकाश ज्यांना दिसला असे लोक तिसऱ्या गटात. 

अधिक वाचा - धक्कादायक... चोर समजून सुरक्षा रक्षकांनी केली बँक कर्मचाऱ्याची हत्या

अशी होती निरीक्षणं

 न्यूयॉर्क विद्यापीठातील प्रा. सॅम पारनिया यांनी याबाबतची निरीक्षणं नोंदवली. त्यानुसार मृत्यूला शिवून परत आलेल्यांपैकी 40 टक्के जणांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विशेष अनुभव घेतला. त्यांच्या उत्तरावरून मृत्यूनंतर काय होत असावं, याचा अंदाज घेता येऊ शकेल काय, याचा विचार सध्या सुरू आहे. एकाने सांगितलेल्या अनुभवानुसार त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला होता. तो म्हणतो, “ माझी अँजिओग्राफी सुरू होती. मशीनकडे पाहत मी डॉक्टरांशी बोलत होतो. हळूहळू मशीनचा आवाज कमी होऊ लागला आणि माझ्या आजूबाजूचे लोक घाबरू लागले. माझ्या डोळ्यांसमोरचं चित्र अंधुक होऊ लागलं आणि काही क्षणांत पूर्ण अंधार पसरला. त्यानंतर थेट मला जाग आली तेव्हा मी डॉक्टरांसमोर होतो आणि ते कुणाला तरी मला मृत्यूच्या दाढेतून वाचवल्याचं सांगत होते. त्यानंतर माझ्या जिवात जीव आला.”

अधिक वाचा - Guinness World Record: 72 वर्षांच्या तरुणीने केला सायकलिंगचा विश्वविक्रम, असा पार केला 3300 किमीचा पल्ला

भुयारातून खाली पडल्याचा अनुभव

हेरॉईनच्या सेवनामुळे कोमात गेलेल्या एका रुग्णाने त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला,”मी एका मोठ्या भुयारातून खाली कोसळत असल्याचा अनुभव मला आला. माझे जवळचे लोक मदतीसाठी ओरडत होते आणि मला काहीच करता येत नव्हतं. त्यापुढचं मला काहीच आठवत नाही. त्यानंतर मी थेट शुद्धीवर आलो तिथून पुढच्या घटना आठवतात.”

अधिक वाचा - मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ११ खासदार आणि अमित शहांची दिल्लीत भेटीची चर्चा; काय घडलं नेमकं? वाचा

प्रकाशाची भिंत

एकाने सांगितलं,”फेब्रुवारी 2014 मध्ये कामानिमित्त एका मिटींगला गेलो होतो. तिथं अचानक मी पडलो आणि माझं हृदयच बंद पडलं. माझी शेवटची आठवण एक तास अगोदरची आणि पुढची मेमरी दोन दिवसांनंतरची आहे. म्हणजेच पडल्यानंतर मधले दोन दिवस काय घडलं, हे मला अजिबातच आठवत नाही. मला जेव्हा ॲम्ब्युलन्समधून नेत होते, तेव्हा मात्र मी स्वतःकडे पाहिल्याचं मला जाणवतं. मला माझी डेड बॉडी समोर दिसत होती. त्यानंतर माझ्यासमोर प्रकाशाची एक भलीमोठी भिंत होती आणि मी त्याच्या अगदी जवळ उभा होतो. त्यानंतर मात्र मला काहीच आठवत नाही. थेट हॉस्पिटलमध्ये शुद्धीत आल्यावर जे घडलं तिथून पुढच्या घटनाच आठवतात. मी शुद्धीत आल्यावर आई म्हणाली की मी मेलो होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी