Lakshmi Death : 32 वर्षांच्या लक्ष्मीचा हृदय क्रिया बंद पडून मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

death of puducherrys elephant lakshmi from cm to governor paid tribute : पुदुचेरी येथे 32 वर्षांच्या लक्ष्मी नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला. निरोगी असलेल्या लक्ष्मी हत्तीची हृदय क्रिया बंद पडली. यामुळे रस्त्यावरून फेरी मारत असताना अचानक हत्ती जमिनीवर कोसळला.

death of puducherrys elephant lakshmi from cm to governor paid tribute
32 वर्षांच्या लक्ष्मीचा हृदय क्रिया बंद पडून मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 32 वर्षांच्या लक्ष्मीचा हृदय क्रिया बंद पडून मृत्यू
  • राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
  • अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

death of puducherrys elephant lakshmi from cm to governor paid tribute : पुदुचेरी येथे 32 वर्षांच्या लक्ष्मी नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला. निरोगी असलेल्या लक्ष्मी हत्तीची हृदय क्रिया बंद पडली. यामुळे रस्त्यावरून फेरी मारत असताना अचानक हत्ती जमिनीवर कोसळला. हत्ती कोसळण्याचे कारण कळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हत्तीच्या मृत्यूची घोषणा केली. 

हत्तीच्या मृत्यूची बातमी कळताच पुदुचेरीच्या कानाकोपऱ्यातून अलोट जनसमुदाय लक्ष्मीच्या अंत्यदर्शनासाठी आला. लक्ष्मी हत्ती पुदुचेरी येथील श्री मनाकुला विनयगर मंदिर (Sri Manakula Vinagayar Mandir or Temple) येथे कार्यरत होता. येणाऱ्या भक्तांच्या डोक्यावर सोंड ठेवून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी लक्ष्मी हत्ती प्रसिद्ध होता. 

एका व्यावसायिकाने मंदिर व्यवस्थापनाला हत्तीदान केला होता. तेव्हापासून हा हत्ती मंदिर परिसरात कार्यरत आहे. देवदर्शनासाठी मंदिरात येणारे भाविक आधी हत्तीचे दर्शन घेत. हत्तीकडून आशीर्वाद घेतल्यानंतर नागरिक मंदिरात देवदर्शनासाठी जात होते. हत्ती भाविकांध्ये लोकप्रिय होता. 

हत्तीच्या निधनाचे वृत्त कळताच पुदुचेरीचे नायब राज्यपाल  तमिलिसाई साउंडराजन (Tamilisai Soundararajan) आणि मुख्यमंत्री एन रंगासामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. 

लक्ष्मी हत्तीची देखभाल करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी हृदय क्रिया बंद पडल्यामुळेच लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हत्तीच्या अंत्यदर्शनासाठी मंदिर परिसरात नागरिकांनी गर्दी केली. गर्दी वेगाने वाढत असल्यामुळे मंदिर प्रशासनाने परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला.

चीनने पाकिस्तानमध्ये तयार केला नवा घातक विषाणू; इंग्लंडच्या 14 क्रिकेटपटुंना झाली बाधा, पहिली टेस्ट संकटात

Vikram S Kirloskar Passes Away: 'टोयोटा'ला लोकप्रिय करणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन; नेहमी प्रसिद्धी असायचे दूर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी