कोरोना रुग्ण संख्येत घट: २४ तासात ३ लाख ५७ हजार नवे रुग्ण, तर ३४४९ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना संसर्गाच्या गती थोडीशी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालायाच्या आकड्यानुसार, मागील २४ तासात देशात कोविड-१९ चे नवे ३ लाख ५७ हजार २२९ रुग्ण सापडले.

Decrease in the number of corona patients
कोरोना रुग्ण संख्येत घट: २४ तासात ३ लाख ५७ हजार नवे रुग्ण   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • कोरोना रुग्ण संख्येत घट
  • मागील २४ तासात ३ हजार ४४९ जणांचा मृत्यू
  • गेल्या २४ तासात ३ लाख जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशात कोरोना(Corona Virus) संसर्गाची गती थोडीशी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालायाच्या (Health Ministry) आकड्यानुसार, मागील २४ तासात देशात कोविड-१९ चे नवे ३ लाख ५७ हजार २२९ रुग्ण सापडले. यादरम्यान देशात ३ लाख २० हजार २८९ जण कोरोनामुक्त झाले. तर या २४ तासात ३ हजार ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) नुसार काल १६ लाख ६३ हजार ७४२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्याचबरोबर, भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूची आतापर्यंत एकूण २९ कोटी ३३ लाख १० हजार ७७९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

आतापर्यंत २ कोटी लोकांना कोरोनाची लागण, तर १.६६ कोटी झाले बरे 

दरम्यान, देशात कोरोना महामारीची लाट येऊन १५ महिने उलटले आहे. दरम्यान, देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. विशेष म्हणजे भारतात १५ महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण रुग्णांची संख्या २.०२ कोटी झाली आहे. यापैकी १.६६ कोटी कोरोनामुक्त झाले आहेत. ३५ लाखांवर उपचार सुरू आहेत. २.२२ लाख लोकांचा मृत्यू झाला.
मागील २४ तासाचा आकडा पाहता कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या कमी झालेली दिसत आहे. रुग्ण वाढीची गती कमी झाली पाहिजे नाहीतर कोरोनाग्रस्तांचा आकडा हा या महिन्यात ३ कोटींवर जाणार असल्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नवे रुग्ण प्रति १० लाख लोकसंख्या

जगातील प्रमुख देशांत संसर्गाचा फैलाव कित्येक पटींनी घटला आहे. ब्रिटनमध्ये १ हजार चाचण्यांत १ रुग्ण सापडत आहे. लोकसंख्येच्या हिशेबाने अमेरिकेत आता १५० लोक १० लाख व ब्राझीलमध्ये २७८ लोक/१० लाख रोज संक्रमित होत आहेत.जगात सर्वात जास्त ३.३२ कोटी रुग्ण अमेरिकेत आहेत. भारतात सर्वाधिक ४८ लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

काय आहे या राज्यांमधील कोरोना स्थिती

महाराष्ट्राला काहीशी दिलासा

राज्यात कोरोनापासून काहीसा दिलासा मिळत आहे. ३ मे ला आलेल्या आकड्यानुसार राज्यात ४८ हजार ६२१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५९ हजार ५०० जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर राज्यात कोरोनापासून मृत पावणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. मिळालेल्या नवीन आकड्यानुसार, ५६७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

दिल्लीने २४ तासात मोडला रेकॉर्ड 

राजधानी दिल्लीत मागील २४ तासात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. काल कोरोनामुळे दिल्लीत ४४८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये एका दिवसात २० हजार पेक्षा कमी रुग्ण समोर आली आहेत. 

उत्तरप्रदेशात २८८ जणांचा मृत्यू 

उत्तरप्रदेशात कोरोनाचा आलेख खाली येताना दिसत आहे. ३ मे ला येथे ३० हजार नवे रुग्ण सापडले होते. तर बरे होणाऱ्यांची संख्या ३८ हजार पेक्षा जास्त आहे. युपीमध्ये एका दिवसात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी