Joint Theatre Command : भारत तिन्ही सेनादलांचे संयुक्त थिएटर कमांड स्थापन होणार...संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची मोठी घोषणा!

Indian Military : देशातील तीन सैन्यांमधील समन्वय वाढविण्यासाठी केंद्र सरकार संयुक्त थिएटर कमांडची (Joint Theatre Command) स्थापना करणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Defence Minister Rajnath Singh)यांनी रविवारी याची घोषणा केली. जम्मू -काश्मीर पीपल्स फोरमने भारतीय सशस्त्र दलाच्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिंग म्हणाले कीआम्ही संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

India to set up Joint Theatre Command
भारत संयुक्त थिएटर कमांडची स्थापना करणार 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंहांची मोठी घोषणा
  • केंद्र सरकार संयुक्त थिएटर कमांडची स्थापना होणार
  • यामुळे भारताचे भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही सेनादलांना एकत्रितरित्या समन्वय साधत मोहिमा आणि रणनीती आखता येणार

Joint Theatre Command : नवी दिल्ली : देशातील तीन सैन्यांमधील समन्वय वाढविण्यासाठी केंद्र सरकार संयुक्त थिएटर कमांडची (Joint Theatre Command) स्थापना करणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Defence Minister Rajnath Singh)यांनी रविवारी याची घोषणा केली. जम्मू -काश्मीर पीपल्स फोरमने भारतीय सशस्त्र दलाच्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिंग म्हणाले की (कारगिलमधील ऑपरेशन विजयमधील संयुक्त मोहिमेला डोळ्यासमोर ठेवत ) आम्ही संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताचे भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही सेनादलांना एकत्रितरित्या मोहिमा आणि रणनीती आखता येणार आहे. याचा फायदा होत भारतीय सैन्यदले आणखी सक्षमपणे आपले कामकाज करू शकणार आहेत. (Defence Minister Rajnath Singh declares that India to set up Joint Theatre Command)

अधिक वाचा : India-China Row: भारताच्या हद्दीत 10 किमी आतपर्यंत घुसली चीनची लढाऊ विमाने

संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी केली महत्त्वाची घोषणा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, संरक्षण उपकरणांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या आयातकर्त्याकडून निर्यातक होण्याच्या दिशेने भारत वेगाने पुढे जात आहे. देशातील प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिल शहीदांचे सर्वोच्च बलिदान देश विसरू शकत नाही. ते म्हणाले, "शहीद आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण आदर देणे हे समाज आणि लोकांचे कर्तव्य आहे." जून 2021 मध्ये, सरकारने संरक्षणदलांना आणखी सक्षम करण्यासाठी आणि सर्व भागधारकांना, विशेषत: भारतीय हवाई दलास नवीन संयुक्त संरचनेला वेगवान करण्यासंदर्भात आठ सदस्यीय पॅनेलची स्थापना केली होती.

अधिक वाचा : National Herald Case : मंगळवारी सोनिया गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसची पुन्हा सत्याग्रहाची हाक

संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्यास पाच वर्षे 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, बर्‍याच काळापासून प्रतीक्षेत असलेले भारतीय सैन्याच्या थिएटर कमांडचे मॉडेल, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत करू शकते. थिएटर कमांड स्थापित करण्यास सुमारे पाच वर्षे लागू शकतात. भविष्यातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तीन सैन्य प्रमुख यांच्यात समन्वय साधला जातो तेव्हा युद्धाच्या वेळी थिएटर कमांडचा योग्य वापर केला जातो. याद्वारे, आवश्यकतेनुसार तीन सैन्यांची संसाधने आणि त्यातील शस्त्रे एकाच वेळी वापरली जाऊ शकतात.

अधिक वाचा : CISCE ISC 12th Result 2022: सीआयएससीई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी प्रथम

देशाने 13000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात सुरू केली 

संरक्षण उत्पादनाचा संदर्भ देताना सिंग म्हणाले, 'भारत (संरक्षण उत्पादनांचा) जगातील सर्वात मोठा आयातदार होता. आज, भारत जगातील सर्वात मोठा आयातदार नाही, परंतु संरक्षण निर्यातीत सहभागी असलेल्या पहिल्या 25 देशांपैकी एक आहे. सिंग म्हणाले की, देशाने 13,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात सुरू केली आहे आणि 2025-26 पर्यंत यात वाढ होत ती 35,000 कोटी रुपये ते 40,000 कोटी रुपयांपर्यत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सरकारने मागील काही वर्षात संरक्षण क्षेत्रातील सुधारणांवर भर दिला आहे. याच अनुषंगाने सरकारने संरक्षण क्षेत्रातील देशाचे परकी अवलंबित्व कमी करत संरक्षण सामुग्रीचे देशातच उत्पादन करण्यावर भर देण्यास सुरूवात केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी