‘त्या’ भयंकर घटनेला आज १ वर्ष पूर्ण, आजही त्या घराजवळून जाताना शेजारी घाबरतात!

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 30, 2019 | 19:31 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

संपूर्ण देशाला हादवणाऱ्या दिल्लीतील बुराडी प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. आज एक वर्षानंतरही त्या घरातील रहस्य पूर्णपणे समोर आलेलं नाही. शेजारी अजूनही त्या घरासमोरून जाताना घाबरतात. पाहा काय होतं ते प्रकरण.

Delhi Burari Suicide Case
दिल्लीतील ‘त्या’ भयंकर घटनेला आज १ वर्ष पूर्ण  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • ३० जून २०१८ रोजी भाटिया कुटुंबियांनी केली सामूहिक आत्महत्या
  • भाटिया कुटुंबातील ११ सदस्यांनी लावली फाशी
  • पोलिसांनी डायरी आणि सीसीटीव्ही फूटेजमधून मिळाली अधिक माहिती
  • तांत्रिक विद्येवरी कुटुंबियांचा विश्वास

नवी दिल्ली: आजच्या बरोबर १ वर्षापूर्वी म्हणजेच ३० जून २०१८ रोजी दिल्लीतील बुराडी इथं असलेल्या संत नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. इथल्या घर क्रमांक १३७/५ मध्ये राहणाऱ्या भाटिका कुटुंबातील ११ सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जुलै २०१८ ला जेव्हा सकाळी घराचे दरवाजे उघडले नाही, तेव्हा भाटिया कुटुंबाचा एक शेजारी त्यांच्या घरात शिरला आणि त्याने जे पाहिलं, ते भयंकर होतं. घरातील १० सदस्य फाशी लावून लटकलेले होते आणि एकाचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. या घटनेमुळे दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला होता.

आजही आहे भितीचं वातावरण

ज्या घरात हे भाटिया कुटुंब राहत होतं. त्याच आत्महत्या केलेल्या घरात आता दोन भाऊ भाड्यानं राहतात. आजही हे घर म्हणजे भुतांचा वाडा आहे, असं लोकांना वाटतं. शेजारी तर रात्री या घरासमोरून एकट्यानं जायला घाबरतात. तिथं राहणाऱ्या लोकांमध्ये अजूनही घराविषयी भीती आहे. भाटिया कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांनी आपल्या घराच्या भिंती उंच करवून घेतल्या आहेत. जेणेकरून त्यांना आपल्या घरातून भाटिया कुटुंबीयांच्या घराचा काहीही भाग दिसणार नाही.

तांत्रिक विद्येवर होता भाटिया कुटुंबीयांचा विश्वास

घटनेच्या एक वर्षानंतर जिथं लोकांच्या मनात आजही भीती आहे. तर दुसरीकडे घटनेनंतर अनेक महिने भाटिया कुटुंबाबद्दल विविध गोष्टी कानावर येत होत्या. भाटिया कुटुंबाच्या घरातून पोलिसांनी मिळालेल्या डायरीतून अनेक गोष्टींबाबत खुलासा झाला होता. या कुटुंबाचा तंत्रविद्येवर विश्वास होता. त्या डायरीत ‘मोक्ष प्राप्ती’साठी आत्महत्येच्या पर्यायाचा उल्लेख होता. पोलिसांनी या घटनेचा संबंध डायरीतील उल्लेखासोबत जोडून पाहिला. कारण त्यात आत्महत्या करण्याची जी पद्धत सांगितली होती, त्यासोबत मिळता-जुळता प्रकारच भाटिया कुटुंबीयांनी केला होता.

आत्महत्येपूर्वी भाटिया कुटुंबीयांनी केलं हे अनुष्ठान

या घटनेसंबंधी एक सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळालं. भाटिया यांच्या घराच्या शेजारी फर्निचरचं दुकान होतं. तिथं लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाटिया कुटुंबातील दोन सदस्य प्लास्टिकचे स्टूल आणि तार घेऊन जात असल्याचं दिसून आलं. याच स्टूल आणि तारेचा वापर करत त्या सर्वांनी आत्महत्या केली. तंत्रविद्येनुसार आत्महत्येच्या तयारीचं हे एक अनुष्ठानच या कुटुंबानं मांडलं होतं.

घरात मिळाल्या अनेक गूढ उकलणाऱ्या डायऱ्या

भाटिया यांच्या घरात पोलिसांनी डायरी मिळाली. या डायरीत ‘बड पूजा’ याचाही उल्लेख आढळला. ही डायरी भाटिया कुटुंबातील आत्महत्या केलेल्या ललित नावाच्या व्यक्तीची होती. ललितचं या संपूर्ण कुटुंबावर नियंत्रण होतं. ललितनेच आपल्या घरातील लोकांना ‘सामूहिक आत्महत्ये’साठी तयार केल्याचं कळतंय. आत्महत्या केली तरी कुणीही मरणार नाही, त्या सर्वांना एक शक्ती वाचवेल, असा विश्वास ललितनं आपल्या कुटुंबीयांना दिला होता. त्याच्या डायरीत एका ठिकाणी लिहिलं होतं, ‘अखेरच्या वेळी जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत असेल तेव्हा आभाळ हलेल, धरणी कंप होईल, तेव्हा तुम्ही घाबरू नका, मंत्रोच्चार वाढवा, मी येऊन तुम्हाला वाचवेल आणि इतरांनाही उतरवण्यात मदत करेल.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘त्या’ भयंकर घटनेला आज १ वर्ष पूर्ण, आजही त्या घराजवळून जाताना शेजारी घाबरतात! Description: संपूर्ण देशाला हादवणाऱ्या दिल्लीतील बुराडी प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. आज एक वर्षानंतरही त्या घरातील रहस्य पूर्णपणे समोर आलेलं नाही. शेजारी अजूनही त्या घरासमोरून जाताना घाबरतात. पाहा काय होतं ते प्रकरण.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल